खेड (पुणे): खेड तालुक्यातील खरपुडी येथे बिबट्याने थेट शेतकऱ्याच्या घरात शिरण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुदैवाने घरमालकाने वेळीच आरडाओरडा केल्याने बिबट्याने पळ काढला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाली आहे.गेल्या पंधरा दिवसांपासून रेटवडी–निमगाव परिसरात बिबट्यांचा उच्छाद वाढत असून चिमुकल्या मुलांवरही हल्ले होत आहेत. वनविभागाकडून प्रयत्न सुरू असले तरी अद्याप बिबट्याला जेरबंद करण्यात यश आलेले नाही.
खेड तालुक्यातील खरपुडी येथे एक बिबट्या शिकार शोधत-शोधत थेट शेतकऱ्याच्या घरात शिरण्याच्या तयारीत होता, तितक्यात घर मालकाने आरडाओरडा केला आणि बिबट्याने तिथून पळ काढला. ही धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. मागच्या पंधरा दिवसात याच परिसरातील रेटवडी आणि निमगाव परिसरात चिमुकल्या मुलांवर बिबट्याने हल्ला केला, या बिबट्याची मजल आता वाढतच चालली असून बिबट्या आता थेट घरात शिरण्याच्या तयारीत आहेत. हे वास्तव सीसीटीव्हीने समोर आणलं आहे. सुदैवाने घर मालकाने वेळीच आरडाओरडा केला, त्यामुळं बिबट्याने पळ काढला. खरपुडी रेटवडी निमगाव परिसरात बिबट्याचे वास्तव्य नागरिकांसाठी धोक्याचं होत असताना वनविभाग बिबट्याला जेरबंद करण्यात अपयशी ठरत आहे.
साडेचार वर्षाच्या चिमुकल्यावर हल्ला; आईच्या आरडाओरडामुळे बिबट्याचा पळ
निमगाव खंडोबा येथे देवांश योगेश गव्हाणे (वय ४.५) या चिमुकल्यावर काही दिवसांपूर्वी बिबट्याने हल्ला केला. देवांश घराबाहेर खेळत असताना बिबट्याने त्याच्या मानेवर झडप घालत जवळपास १०० फूट फरफटत नेले. त्याच क्षणी देवांशची आई बाहेर आली आणि जोरजोराने ओरडली. अचानक आवाजाने बिबट्या घाबरला व पळून गेला. चिमुकल्याच्या मानेवर दातांच्या खुणांनी जखम झाली असून तो उपचार घेत आहे.
बिबट्यांचा वाढता उच्छाद; ग्रामस्थ भयभीत
निमगाव, दावडी व रेटवडी परिसरात दोन महिन्यांपासून बिबट्यांचे वारंवार दर्शन होत असून कोंबड्या, कुत्री, बकऱ्या उचलून नेण्याच्या घटनाही वाढल्या आहेत. दिवसाढवळ्या बिबट्यांचे दर्शन होत असल्याने ग्रामस्थ भयभीत आहेत.
पुणे जिल्ह्यात बिबट्यांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे चित्र आहे. खेड, शिरूर, आंबेगाव, जुन्नर, जेजुरी आणि पुरंदर परिसरात ऊसतोड सुरू असल्याने शेतात लपून बसलेले बिबटे बाहेर येत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. मात्र यंदा संख्या अचानक वाढल्याने प्रशासनाचेच हात-पाय सुटले आहेत.
बिबट्यांना रोखण्यासाठी उपाययोजना सुरू
प्रशासनाने संबंधित भागात पिंजरे उपलब्ध करून दिले असून वनविभागाचे अधिकारीही गस्त वाढवून आहेत. तरीही बिबट्यांची संख्या कमी होताना दिसत नाही.पुणे जिल्ह्यात बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. खेड, शिरूर, आंबेगाव, जुन्नर, जेजुरी, पुरंदर भागात ऊसाची शेती मोठ्या प्रमाणावर आहे. याठिकाणी सध्या ऊसतोड सुरु असल्याने शेतात लपून बसलेले बिबटे बाहेर पडू लागल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे. परंतु दरवर्षी पेक्षा यंदा बिबट्याच्या संख्येत अचानक वाढ झाल्याचेही ग्रामस्थांचे म्हणणे आहे. ही वाढ कशामुळे झाली? याबाबत कोणाकडेही उत्तर नाही. प्रशासनाकडून आता बिबट्यांना रोखण्यासाठी उपाययोजना सुरु आहेत. प्रशासनाकडून या तालुक्यांना पिंजरे पुरवले जात आहेत. वनविभागाचे अधिकारीही या भागात तैनात आहे. परंतु बिबट्यांची संख्या कमी होताना दिसत नाही.