पुणे : महिला सन्मान या आशयावर आधारित स्मार्ट सुनबाई या मराठी चित्रपटाचा विशेष शो आज सिटी प्राइड, कोथरूड येथे आयोजित करण्यात आला. शांतीदूत परिवाराचे स्नेही आणि शांतीदूत परिवार सेवा रत्न पुरस्कारार्थी प्रसिद्ध अभिनेते भाऊ कदम, रोहन पाटील आणि अंशुमन विचारे यांच्या भूमिका असलेल्या या चित्रपटात निखळ विनोद, रहस्य आणि प्रबोधन यांचा सुंदर मेळ पाहायला मिळतो.महिला बचत गटाच्या सहलीभोवती फिरणारे कथानक महिला सन्मानाचा सशक्त संदेश देणारे असून, प्रेक्षकांनी कुटुंबासह नक्की पाहावा, असा संदेश आयोजकांनी दिला.

या प्रसंगी शांतीदूत परिवाराच्या वतीने डॉ. विठ्ठल जाधव (IPS), विशेष पोलिस महानिरीक्षक, महाराष्ट्र राज्य (सेवानिवृत्त) यांनी अभिनेते रोहन पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. तसेच चित्रपटाचे निर्माते गोवर्धन दोलताडे, दिग्दर्शक शिवाजी दोलताडे आणि इतर सहकलाकारांचा सत्कार शांतीदूत परिवाराच्या संस्थापक अध्यक्षा सौ. विद्या ताई जाधव आणि सुरेश भाऊ सकपाळ यांच्या हस्ते करण्यात आला

