सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पैशांवरून वाद विकोपाला, पतीकडून बिहार अन् कॅनडातून पत्र पाठवत पत्नीला 'तिहेरी तलाक' देण्याचा प्रयत्न; नाशिकमध्ये खळबळ
  • मराठी माणूस पंतप्रधान होण्याची शक्यता; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचं वक्तव्य, अमेरिकेचा संदर्भ
  • अजितदादा-शिंदेंसह 20 नेत्यांच्या अडचणी वाढल्या, मतदारांना प्रलोभनं देण्याच्या वक्तव्यांची निवडणूक आयोगाकडून गंभीर दखल
  • उद्या निवडणुका अन् आज पुढे ढकलल्या ही चूक; देवेंद्र फडणवीसांचे निवडणूक आयोगावर आक्षेप
 जिल्हा

महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते रायगड फोर्टीप्लस मास्टर्स बिग बॅश क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण

विठ्ठल ममताबादे (प्रतिनिधी )    01-12-2025 17:27:45

उरण : "क्रिकेटवर मी जीवापाड प्रेम करतो. मी क्रिकेटचा एवढा चाहता आहे की, भारत-पाकिस्तान सामना कुठल्याही देशात असू दे, मी आवर्जून बघायला जातो. दर रविवारी पनवेलच्या एएससी महाविद्याल्याच्या मैदानावर सकाळी आठला हजर असतो, मनसोक्त क्रिकेट खेळतो. भिमाशंकरला वेळ मिळाला की ट्रेक करतो. जिंदादिल आयुष्य जगतो," असे आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि कॉंग्रेसचे  रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत मोहोपाडा येथे म्हणाले. त्यांच्या हस्ते रायगड फोर्टीप्लस मास्टर्स बिग बॅश क्रिकेट स्पर्धेचे रविवारी (ता. ३०) बक्षीस वितरण  करण्यात आले.यावेळी पुढे ते म्हणाले, लिलाव प्रक्रियेला मी होतो.

आता मोठमोठ्या रकमेच्या बक्षिसा आणि सुंदर नियोजन-आयोजन पाहून 'इवलेसे रोप लावियले दारी, त्याचा वेलू गेला गगनावरी' असे म्हणावेसे वाटते."महेंद्रशेठ घरत खंबीरपणे आमच्या पाठीशी उभे आहेत. त्यामुळेच आम्ही भव्यदिव्य स्पर्धां आयोजित करू शकतोय. यंदाचे तिसरे पर्व आहे. त्यांनी ३२ संघांतील सुमारे ६०० खेळाडूंना स्पोर्टस ट्रॅक-टी-शर्ट दिले. महेंद्रशेठ घरत यांच्यासारखे बहुआयामी व्यक्तिमत्त्व आम्हा खेळाडूंना दीपस्तंभासारखे आहेत. ते आमच्यासाठी सर्वात मोठा आधार आहेत," असे फोर्टीप्लस रायगडचे अध्यक्ष अण्णा गावडे म्हणाले. 'एक धाव आरोग्यासाठी' या थीमवर या स्पर्धा मोहोपाडा येथे आयोजित करण्यात आल्या होत्या.

दोन मोटरसायकल, पाच सायकल आणि रोख पाच लाख रुपयांची बक्षिसे या स्पर्धेत होती. फोर्टीप्लसचे सहा खेळाडू, फोर्टी फाईव्हप्लसचे चार आणि फिफ्टीप्लसचे तीन खेळाडू अशी संघरचना होती. रायगड जिल्ह्यातील असे ३२ संघ आणि ६०० खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते. उपाध्यक्ष वार. बी. पाटील, कार्याध्यक्ष मर्फीशेठ क्रियाडो, किरीट पाटील आणि पदाधिकाऱ्यांनी आयोजनात महत्त्वाची भूमिका निभावली. या स्पर्धा मोहोपाडा येथील एनआयएसएमच्या सुसज्ज मैदानावर झाल्या.


 Give Feedback



 जाहिराती