सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पैशांवरून वाद विकोपाला, पतीकडून बिहार अन् कॅनडातून पत्र पाठवत पत्नीला 'तिहेरी तलाक' देण्याचा प्रयत्न; नाशिकमध्ये खळबळ
  • मराठी माणूस पंतप्रधान होण्याची शक्यता; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचं वक्तव्य, अमेरिकेचा संदर्भ
  • अजितदादा-शिंदेंसह 20 नेत्यांच्या अडचणी वाढल्या, मतदारांना प्रलोभनं देण्याच्या वक्तव्यांची निवडणूक आयोगाकडून गंभीर दखल
  • उद्या निवडणुका अन् आज पुढे ढकलल्या ही चूक; देवेंद्र फडणवीसांचे निवडणूक आयोगावर आक्षेप
 व्यक्ती विशेष

अजितदादा–शिंदेंसह 20 नेत्यांची अडचण वाढली; प्रलोभनात्मक वक्तव्यांवर आयोगाची गंभीर दखल

डिजिटल पुणे    01-12-2025 17:47:42

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रचारादरम्यान आचारसंहितेचा भंग करणारी व मतदारांना प्रलोभने देणारी वक्तव्ये करणाऱ्या राज्यातील बड्या नेत्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, मंत्री गुलाबराव पाटील, संजय शिरसाठ, जयकुमार गोरे, चित्रा वाघ यांच्यासह तब्बल 20 नेत्यांच्या विवादित वक्तव्यांची निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतली आहे.आयोगाने संबंधित नेत्यांनी ज्या ठिकाणी भाषणं केली त्या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून तातडीने सविस्तर अहवाल मागवला आहे. या अहवालानंतर पुढील कारवाई निश्चित होणार आहे.

कोणते वक्तव्य अडचणीचे?

अजित पवार : निधीला कात्री लावण्याचा इशारा

गुलाबराव पाटील : लक्ष्मी दर्शन होणार असल्याचे वक्तव्य

एकनाथ शिंदे : तिजोरीच्या चाव्या देण्याविषयी उल्लेख

चित्रा वाघ : “खा कुणाचं पण मटण मात्र दाबा कमळाचं बटण” अशी टिप्पणी

आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सर्व सभांचे व्हिडीओ रेकॉर्डिंग तपासून या प्रकरणांची छाननी सुरू केली आहे.ज्या ज्या ठिकाणी नेत्यांच्या सभा असतात त्या त्या ठिकाणी निवडणूक आयोगाचे अधिकारी आणि कॅमेरे असतात. त्याच्या आधारे आता तपास केला जाणार आहे. असे 20 नेते आहेत ज्यांच्या वक्तव्यांची दखल निवडणूक आयोगाने घेतली आहे.

काही निवडणुका पुढे ढकलण्यामागचे कारण

राज्यातील 24 नगरपालिका आणि सुमारे 150 सदस्यांच्या निवडणुका 20 डिसेंबरला होणार आहेत. काही निवडणुका पुढे ढकलल्याबाबत राज्य निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी स्पष्टीकरण दिले आहे की, कायदेशीर सल्ला आणि सर्व बाजूंचा विचार करूनच हा निर्णय घेतला आहे.१७ (१)(ब) तरतुदीनुसार, उमेदवाराने कोर्टात अपील केल्यास त्याला अर्ज मागे घेण्यासाठी ठराविक वेळ देणे आवश्यक असते. अन्यथा संपूर्ण निवडणूक प्रक्रियेलाच स्थगिती देण्याची वेळ येऊ शकली असती. त्यामुळे काही निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत.ढकललेल्या निवडणुकांना नियम क आणि ड नुसार आवश्यक वेळ देण्यात आला असून त्या देखील 20 डिसेंबरलाच घेतल्या जाणार आहेत.

सर्व बाजूंचा विचार करून आणि कायदेशीर सल्ला घेऊनच काही निवडणुका पुढे ढकलल्या असं राज्य निवडणूक आयोगाच्या सूत्रांकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. राज्यातील एकूण 24 नगरपालिका आणि दीडशे सदस्यांच्या निवडणुका या 20 डिसेंबरला होणार आहेत. या निवडणुकांवर परिणाम होणार नसल्याचे राज्य निवडणूक आयोगाचे म्हणणं आहे. 17 1( ब ) तरतुदीनुसार उमेदवाराने कोर्टात अपील केल्यास उमेदवाराला अर्ज मागे घेण्यासाठी ठराविक वेळ देणं गरजेचं असतं. अन्यथा संपूर्ण निवडणुकीवर परिणाम झाला असता आणि निवडणुका स्थगित कराव्या लागल्या असत्या. त्यामुळे ठराविक निवडणुका पुढे ढकल्याची माहिती आहे.

ज्या निवडणुका पुढे ढकलले आहेत त्यांना पुरेसा वेळ नियम क आणि ड प्रमाणे देण्यात आला आहे आणि त्यानुसार 20 डिसेंबरला ढकललेल्या निवडणुका घेण्यात येत आहेत. 24 नगरपालिका मधील नगराध्यक्ष आणि 150 च्या जवळपास सदस्यांच्या प्रचार खर्चाचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने विचाराधीन ठेवला असून याबद्दल लवकरच निर्णय जाहीर केला जाईल. याबाबत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत आज बैठक पार पडली.

प्रचार खर्चावर निर्णय प्रलंबित

24 नगरपालिका आणि सुमारे 150 सदस्यांच्या निवडणुकीतील प्रचार खर्चाबद्दलचा निर्णय आयोगाने अद्याप विचाराधीन ठेवला आहे. याबाबत आज राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत बैठक पार पडली असून लवकरच अंतिम निर्णय जाहीर होणार आहे.


 Give Feedback



 जाहिराती