उरण : शिव प्रतिष्ठानचे अध्यक्ष तसेच प्रभावशाली न्यूज उपसंपादक सत्यजित पाटील यांची कन्या स्वरूपा सत्यजित पाटील हिचा वाढदिवस गिरीजा फॉउंडेशन नेरे येथील अनाथाश्रम मधील अनाथ मुलांसोबत साजरा करण्यात आला. ह्या वेळेस मोठ्या संख्येने शिव मावळे सुनील अंबावडे, अविनाश ठोसर, सुरेश बार्वे,अमर कुसळे, संदीप पाटील, राकेश कुसळे,शंतनू कदम,रोहन शिर्के, आनंद पुजारी, अथर्व,आदी मान्यवर उपस्थित होते.ह्या वेळेस गिरीजा फॉउंडेशनच्या सुनंदा ताई ह्यांनी समाजातील लोकांना असे आवाहन केले की सर्व लोकांनी जर सत्यजित पाटील ह्यांनी त्यांच्या मुलीचा वाढदिवस हा आमच्या अनाथ आश्रमामध्ये साजरा केला तसेच ते अनेक महिन्यातून सामाजिक बांधिलकी जपत आमच्या अनाथाश्रमा मध्ये काही ना काही उपक्रम राबवत असतात ह्यांचा आदर्श प्रत्येक समाजातील घटकाने घेतला तर आमच्या अनाथ मुलांच्या चेहऱ्यावरील हाव भाव हे एक वेगळं खूप काही सांगून जाईल तसेच त्यानां अनाथ असल्याची जाणीव होणार नाही.यावेळी सर्वांनी स्वरूपा पाटील हिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.