उरण : रक्तदानाविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने व गोरगरिबांना वेळेत रक्त उपलब्ध व्हावा या अनुषंगाने ओएनजीसी उरण प्लांटच्या वतीने बुधवार दि १० डिसेंबर २०२५ रोजी ओएनजीसी मेन गेट, द्रोणागिरी भवन उरण येथे सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.ओएनजीसी स्थानिय लोकाधिकार समिती, ओएनजीसी (W.O.U )कर्मचारी संघटनेने आयोजित केलेल्या या रक्तदान शिबीरात मुंबई व नवी मुंबई मधील नामांकित रुग्णालय मधील रक्तपेढीचे विशेष सहकार्य लाभणार आहे. या कार्यक्रमास उमेशा सोंदकूर (मुख्य महाव्यवस्थापक सयंत्र व्यवस्थापक उरण ), संजीव कुमार मोहन (मुख्य महाव्यवस्थापक (उत्पादन)आधारभूत सेवा, मनिष मेहता (महाव्यवस्थापक वित्त आणि लेखा विभाग ), श्रीमती भावना आठवले (महा व्यवस्थापक प्रभारी मानव संसाधन )यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
रक्तदान करणे ही काळाची गरज आहे. रक्तदान सारख्या सामाजिक उपक्रमात सहभागी होऊन देशकार्याला हातभार लावावा. रक्त दात्यांनी रक्तदानाला येताना कोणतेही एक ओळखपत्र (आधारकार्ड, पैनकार्ड, मतदान कार्ड, काम करीत असलेल्या कंपनीचे ओळखपत्र) सोबत आणावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.अधिक माहितीसाठी नागरिकांनी, रक्तदात्यांनी ओएनजीसी उरण प्लांटचे अध्यक्ष खासदार अनिल देसाई , वरीष्ठ उपाध्यक्ष पराग कदम, कार्याध्यक्ष संदिप गावडे, सरचिटणीस प्रदिप मयेकर, उपाध्यक्ष उज्जेश तुपे - 8291281697, 9764165427 सचिव-बाळकृष्ण काशिद - 9969227951, सचिव दिलीप आरदाळकर-9819910718, संघटक सचिव नितीन गवळी - 9773688470 यांच्याशी संपर्क साधावे.