सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी! पुण्याच्या जमीन घोटाळ्यातील आरोपी शीतल तेजवानीला अटक; 300 कोटींच्या गैरव्यवहारात कारवाई
  • लोकांमध्ये जाऊ नको, दीड-दोन महिने आराम कर, राज ठाकरेंचा संजय राऊतांना 'प्रेमळ दम'
  • एमपीएससी परीक्षा अन् निवडणुकांचा निकाल एकाच दिवशी होणार? जिल्हाधिकाऱ्यांसह महसूल विभागातील कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त भार, विद्यार्थीही संभ्रमात
  • राजकीय नेत्यांना काय वाटतं यापेक्षा कायदा महत्त्वाचा; भाजप नेत्यांच्या टीकेनंतर राज्य निवडणूक आयोगाची खमकी भूमिका
  • जय पवार–ऋतुजा पाटील यांच्या लग्नासाठी खास ‘वऱ्हाड’ बहरीनला; केवळ 400 पाहुण्यांना निमंत्रण, राष्ट्रवादी पक्षातून फक्त दोनच नेते निमंत्रित
  • कोर्टाच्या निर्णयाने निवडणूक आयोगाचं गणित विस्कटलं, मोठा निर्णय घ्यायच्या हालचाली, 29 महानगरपालिका आयुक्तांची तातडीची बैठक बोलावली
 जिल्हा

राज्य विधिमंडळाचे नागपूर हिवाळी अधिवेशन ८ ते १४ डिसेंबर दरम्यान ;विधानसभा आणि विधानपरिषद विधिमंडळ कामकाज सल्लागार समिती बैठकीत निर्णय

डिजिटल पुणे    03-12-2025 17:03:51

मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवार ८ ते रविवार १४ डिसेंबर २०२५ या कालावधीत नागपूरमध्ये होणार आहे. १३ डिसेंबर शनिवार आणि १४ डिसेंबर रविवार शासकीय सुट्टीच्या दिवशीही दोन्ही सभागृहाचे कामकाज घेण्याचा निर्णय विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला.विधानभवन येथे विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला विधान परिषद सभापती प्रा.राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, विधानसभा सदस्य सर्वश्री सुधीर मुनगंटीवार, दीपक केसरकर, जितेंद्र आव्हाड, भास्कर जाधव, सुनील प्रभू, अमीन पटेल विधानपरिषद सदस्य अनिल परब, प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, विक्रम काळे, सतेज पाटील, विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

भारताच्या संविधानाची गौरवशाली अमृत महोत्सवी वाटचाल या ऐतिहासिक पर्वानिमित्त २६ मार्च २०२५ रोजी विधानसभेत चर्चा झाली होती. या वेळी झालेल्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  केलेल्या भाषणाचे पुस्तक स्वरूपातील संकलन महाराष्ट्र विधिमंडळ वि.स. पांगे संसदीय प्रशिक्षण केंद्राच्या पुढाकारातून करण्यात आले आहे. या पुस्तकाचे प्रकाशन मंगळवार, ९ डिसेंबर २०२५ रोजी राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते करण्यात येणार आहे, असे विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी यावेळी सांगितले.

 


 Give Feedback



 जाहिराती