उरण : जागतिक दिव्यांग दिन दरवर्षी ३ डिसेंबर रोजी जगभरात साजरा केला जातो. १९९२ पासून संयुक्त राष्ट्र संघातर्फे हा दिन जाहीर केला गेला हा दिवस दिव्यांग व्यक्तींबाबत सामान्य जनतेत जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशाने साजरा केला जातो .बुधवार दिनांक ३ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता जागतिक दिव्यांग दिनानिमित्त जेएनपीए बहुउद्देशीय सभागृह येथे उरण तालुक्यातील दिव्यांग बांधवां करता दिव्यांग सामाजिक संस्था उरण यांच्या वतीने जागतिक दिव्यांग दिन सोहळा साजरा करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मनीषा जाधव (महाव्यवस्थापिका प्रशासन व सचिव),रवींद्र पाटील(जेएनपीए विश्वस्त),सयाजी साळुंखे (जेएनपीए मॅनेजर इस्टेट ), अरविंद घरत ,संदीप घरत(जेएनपीए प्रतिनिधी),वर्षा म्हात्रे(दिव्यांग प्रशासन अलिबाग),सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार, सामाजिक कार्यकर्ते विशाल पाटेकर, वकील धीरज डाकी,जेष्ठ पत्रकार विठ्ठल ममताबादे,पत्रकार उत्कर्ष समितीचे उरण तालुका अध्यक्ष पूजा चव्हाण, पत्रकार तृप्ती भोईर,पत्रकार सायली साळुंके आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून दिपप्रज्वलानंतर कार्यक्रमाला सुंदर सुरुवात झाली. संस्थेचे सल्लागार मदन पाटील यांनी प्रास्ताविकात दिव्यांगाच्या कल्याणासाठी संघटना स्थापना झाली असून यंदाचे हे ५ वर्ष आहे. जेएनपीएकडून दिव्यांगांच्या या कार्यक्रमातून दरवर्षी दिव्यांगाना हे हक्काचे व्यासपीठ मिळत आहे.असे सांगितले.अरविंद घरत यांनी ही आपल्या मनोगतात दिव्यांगांचे मनोबल वाढवले. संतोष पवार यांनी दिव्यांगांसाठी प्रोत्साहन पर आपल्या भाषणात दिव्यांग संघटनेचे काम अतिशय सकारात्मक गतीने चालू आहे. परंतु दिव्यांग बांधवांना जेएनपीए, ओएनजीसी कडून रोजगाराची संधी मिळाली तर आजच्या या जागतिक दिव्यांग दिनाचे महत्त्व वाढेल,त्याचप्रमाणे सिडको तर्फे एखाद्या जागा देण्यासाठी प्रयत्न झाला तर त्यांना एक जीवनासाठी आधार मिळेल असे मनोगत व्यक्त केले.
मनीषा जाधव यांनी आपल्या मनोगतात दिव्यांगाच्या इच्छाशक्तीचे, बुध्दीचे कौतुक करून त्यांच्यासाठी शॉपिंग सेंटर येथे जे गाळे आहेत ते व्यवसायासाठी उपलब्ध करून देण्यासाठी व त्यांना रोजगार मिळण्यासाठी जेनपिए प्रशासनाकडून सी एस आर फंडातून मदत करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन दिले. व्यासपीठावरील सर्व उपस्थित मान्यवरांनी आपल्या शब्दांत दिव्यांगांचे मनोबल वाढवले.दिव्यांग सामाजिक संस्थेतर्फे दिव्यांगासाठी भेटवस्तू देण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील वर्तक यांनी तर आभार प्रदर्शन महेंद्र म्हात्रे यांनी केले. आभारानंतर कार्यक्रमाची सुंदररीत्या सांगता झाली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिव्यांग सामाजिक संस्थेचे अध्यक्ष महेंद्र म्हात्रे,उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, खजिनदार समीर ठाकूर, सचिव उमेश पाटील, महेश पाटील, योगेश पाटील, संदेश राजगुरू, रणिता ठाकूर, दिव्यांग सामाजिक संस्थेचे सल्लागार मदन पाटील यांच्यासह सर्वच पदाधिकारी सदस्यांनी विशेष मेहनत घेतली आहे.जागतिक दिव्यांग दिन हा एक अविस्मरणीय दिवस आहे ,ज्याने दिव्यांग व्यक्तींच्या जीवनाची गुणवत्ता वाढवण्यासाठी आणि त्यांचे जीवन सुखी करण्यासाठी प्रयत्न केला जातो.