सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी! पुण्याच्या जमीन घोटाळ्यातील आरोपी शीतल तेजवानीला अटक; 300 कोटींच्या गैरव्यवहारात कारवाई
  • लोकांमध्ये जाऊ नको, दीड-दोन महिने आराम कर, राज ठाकरेंचा संजय राऊतांना 'प्रेमळ दम'
  • एमपीएससी परीक्षा अन् निवडणुकांचा निकाल एकाच दिवशी होणार? जिल्हाधिकाऱ्यांसह महसूल विभागातील कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त भार, विद्यार्थीही संभ्रमात
  • राजकीय नेत्यांना काय वाटतं यापेक्षा कायदा महत्त्वाचा; भाजप नेत्यांच्या टीकेनंतर राज्य निवडणूक आयोगाची खमकी भूमिका
  • जय पवार–ऋतुजा पाटील यांच्या लग्नासाठी खास ‘वऱ्हाड’ बहरीनला; केवळ 400 पाहुण्यांना निमंत्रण, राष्ट्रवादी पक्षातून फक्त दोनच नेते निमंत्रित
  • कोर्टाच्या निर्णयाने निवडणूक आयोगाचं गणित विस्कटलं, मोठा निर्णय घ्यायच्या हालचाली, 29 महानगरपालिका आयुक्तांची तातडीची बैठक बोलावली
 जिल्हा

उरण मध्ये स्ट्रॉंग रूमला पोलिसांचा कडक बंदोबस्त

विठ्ठल ममताबादे (प्रतिनिधी )    03-12-2025 18:36:09

उरण :  उरण नगरपरिषदेचे सार्वत्रिक निवडणूक २ डिसेंबर २०२५ रोजी संपन्न झाली निकाल ३ डिसेंबर २०२५ लागणार होते मात्र उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार उरण नगरपरिषदेच्या निकाल २१ डिसेंबर २०२५ लागणार आहे. न्यायालयाने मतपेटी या कडक बंदोबस्त मध्ये ठेवण्यात यावेत असे आदेश दिल्याने उरण नगरपरिषदेत स्ट्रॉंग रूम तयार करण्यात आले असून या स्ट्रॉंग रूममध्ये मतपेटी सुरक्षित ठेवण्यात आलेले आहेत. स्ट्रॉंग रूमसाठी २४ तास कडक पोलिस बंदोबस्त असून एक ए पी आय व १२ अंमलदार दिवसासाठी कार्यरत आहेत तर रात्री एक अधिकारी वीस पोलीस कर्मचारी कार्यरत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश देवरे यांनी दिली आहे.

 उरण नगर परिषदेच्या स्ट्रॉंग रूममध्ये अग्निशमन यंत्रणा कार्यरत असून एकूण आठ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत.कॅमेऱ्याच्या माध्यमातून स्ट्रॉंग रूम वर,मतपेटीवर लक्ष ठेवले जात आहे. राजकीय पक्षाचे प्रतिनिधी कधीही येऊन जाऊ शकतात. बघून जाऊ शकतात त्यांचे रजिस्टर वेगळे ठेवले आहे. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार उद्धव कदम यांनी दिली आहे. स्ट्रॉंग रूमसाठी उरण पोलिसांचा कडक बंदोबस्त असून महाराष्ट्र शासनातर्फे योग्य ती खबरदारीचे उपायोजना स्ट्राँग रूमसाठी करण्यात आले आहेत.निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सर्व नियमांचे पालन करून स्ट्रॉंग रूम व मतपेटी सुरक्षित ठेवण्यात आले आहेत.


 Give Feedback



 जाहिराती