उरण: न्हावा शेवा सी एच ए आधार सामाजिक संस्था गेल्या सात वर्षांपासून अनेक सामाजिक कार्यात सातत्यपूर्ण कार्यरत आहे. न्हावा शेवा सी एच ए आधार सामाजिक संस्था आणि तेरणा रक्तपेढी नेरुळ यांच्या संयुक्त विद्यमाने कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय पिरकोन येथे सामाजिक बांधिलकी जपत भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी जीवन गावंड साहेब (क.भ.पा. विद्यालय पिरकोन चेअरमन), विनोद म्हात्रे (काँग्रेस उरण तालुका अध्यक्ष),रुपेश भगत (न्हावा शेवा सी.एच.ए.संस्था अध्यक्ष), डॉ. दत्ता राठोड सर (तेरणा ब्लड सेंटर)आदी मान्यवर उपस्थित होते . रक्तदान शिबिरात एकूण ११३ रक्तदात्यांनी रक्तदान केले, रक्तदान केलेल्या सर्व रक्तदात्यांना न्हावा शेवा सी.एच.ए.आधार सामाजिक संस्थेमार्फत सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी न्हावा शेवा सी एच ए आधार सामाजिक संस्थेच्या सर्व पदाधिकारी आणि सभासदांनी विशेष मेहनत घेतली. तसेच या कार्यक्रमाप्रसंगी महेंद्र घरत (कामगार नेते),रुपेश पाटील (मंत्रा इंटरप्राईसेस),तेजस डाकी (लँडलोर्ड डेव्हलपर),ऍड. अविनाश पाटील (पाणदिवे),डॉ. हिराचंद पाटील सर (श्री नंदाई प्रतिष्ठान वशेणी),ऊर्मिला नाईक (सरपंच कळंबूसरे),रोशन पाटील (सरपंच सारडे), जितेंद्र म्हात्रे( गोवठणे),समीर म्हात्रे (सायरा समीर म्हात्रे सामाजिक संस्था),गंगाधार जोशी (मानव विकास अधिकारी-रायगड)आदी मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली.न्हावा शेवा सी एच ए आधार सामाजिक संस्थेच्या ईतर सामाजिक उपक्रमांप्रमाणेच या उपक्रमाचं सुद्धा सर्वच स्तरातून भरभरून कौतुक होताना दिसत आहे.