सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • शीतल तेजवानीची अटक फक्त दिखावा, पण पार्थ पवारवर 1800 कोटींची सरकारी जमीन खाऊनही कारवाई होत नाही, एफआयआरमध्ये नाव नाही; अंजली दमानियांचा संतापाचा उद्रेक
  • भाजपच्या 175 जागा आल्यास ईव्हीएम हॅक करुन निवडणुका जिंकल्याचं सिद्ध होईल; स्ट्राँग रुमवरुन काँग्रेसचा गंभीर आरोप
  • शेतकऱ्यांना अपघात सुरक्षा सानुग्रह योजनेचा लाभ ऑनलाईन, महाडीबीटी पोर्टलद्वारे करता येणार अर्ज; कृषिमंत्र्यांची घोषणा
  • लोकांना महायुती हवीय, पण फाटाफूट कराल तर स्वतंत्र लढू; शिवसेना शिंदे गटाचा भाजपाला इशारा, रवींद्र चव्हाणांवर घणाघात
  • रोहित पवार हाजीर हो... माणिकराव कोकाटेंच्या बदनामी प्रकरणात नाशिक न्यायालयाकडून हजर राहण्याचे आदेश
  • मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी दिग्विजय पाटील यांची कसून चौकशी; पार्थ पवारांवरही अटकेची टांगती तलवार
 DIGITAL PUNE NEWS

चंद्रपूर अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ‘डिजिटल स्मार्ट रीडिंग झोन’चा मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शुभारंभ

डिजिटल पुणे    04-12-2025 12:23:41

मुंबई : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात येऊन  विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक डिजिटल शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. असे अभिनव उपक्रम महाविद्यालयांनी राबवावेत असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी सांगितले. मंत्रालयात’ डिजिटल स्मार्ट रीडिंग झोन’ उपक्रमाचा शुभारंभ मंत्री पाटील यांच्या हस्ते  दूरदृश्यप्रणालीद्वारे करण्यात आला.यावेळी आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक वुईके (ऑनलाईन), उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे संचालक डॉ. प्रमोद नाईक, ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, तसेच विभागातील अधिकारी, प्राचार्य, प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

मंत्री पाटील म्हणाले, विद्यार्थ्यांना जागतिक ज्ञान एका क्लिकवर उपलब्ध होत आहे. डिजिटल रीडिंग झोनमुळे वाचन संस्कृतीला मोठी चालना मिळेल आणि  विद्यार्थ्यांना  संशोधनासाठी उपयुक्त माहिती सहज उपलब्ध होईल.या उपक्रमात जागतिक दर्जाच्या नामांकित अशा १० हजारपेक्षा अधिक जर्नल्सचा समावेश आहे. तसेच विद्यार्थ्यांना कुठेही, कधीही अभ्यासाची सोय, ऑफलाईन डाउनलोड करण्याची सोय उपलब्ध होणार आहे. तसेच स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक अभ्यास सामग्री, चालू घडामोडी, जनरल स्टडीज साहित्य आणि परीक्षानिहाय वर्गीकृत माहिती प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.


 Give Feedback



 जाहिराती