छत्रपती संभाजीनगर : भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार, दिनांक ०१ नोव्हेंबर २०२५ या अर्हता दिनांकावर आधारीत पदवीधर मतदारसंघासाठी नव्याने मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम घोषित केला आहे. सदर सुधारीत कार्यक्रमानुसार मतदारयादीच्या प्रारूप प्रसिध्दीचा दिनांक ०३ डिसेंबर, २०२५ (बुधवार) होता. त्यानुसार प्रारुप मतदार यादी आज प्रसिध्द करण्यात आली.विभागीय आयुक्त कार्यालयात या कार्यक्रमावेळी विभागीय आयुक्त तथा ०५-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ मतदार नोंदणी अधिकारी जितेंद्र पापळकर, अपर आयुक्त सामान्य प्रशासन तथा सहायक मतदार र्नादणी अधिकारी मंजुषा मिसकर यांच्यासह तसेच राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकूण 46 हजार 406 पुरूष, 15 हजार 908 महिला व 4 तृतीयपंथी असे एकूण 62 हजार 318 मतदार आहेत. जालना जिल्ह्यात एकूण 23 हजार 648 पुरूष, 5 हजार 272 महिला तर 2 तृतीयपंथी असे एकूण 28 हजार 922 मतदार आहेत. परभणी जिल्ह्यात 16 हजार 635 पुरूष, 4 हजार 64 महिला तर 1 तृतीपंथी असे एकूण 20 हजार 700 मतदार आहेत. हिंगोली जिल्ह्यात 6 हजार 476 पुरूष, 1 हजार 528 महिला असे एकूण 6 हजार 4 मतदार आहेत. नांदेड जिल्ह्यात 23 हजार 867 पुरूष, 6 हजार 264 महिला तर 4 तृतीयपंथी असे एकूण 30 हजार 135 मतदार आहेत. लातूर जिल्ह्यात 17 हजार 492 पुरूष, 4 हजार 993 महिला तर 2 तृतीयपंथी असे एकूण 22 हजार 487 मतदार आहे. धाराशिव जिल्ह्यात 16 हजार 762 पुरूष, 4 हजार 47 महिला असे एकूण 20 हजार 809 मतदार आहेत. बीड जिल्ह्यात 34 हजार 485 पुरूष, 9 हजार 687 महिला तर 2 तृतीयपंथी असे एकूण 47 हजार 174 मतदार आहेत. विभागातील आठही जिल्ह्यात एकूण 1 लाख 88 हजार 771 पुरूष, 51 हजार 763 महिला तर 15 तृतीयपंथी असे एकूण 2 लाख 40 हजार 549 मतदार आहेत.
पुढील अत्यंत महत्वाचा टप्पा, म्हणजेच दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी (कलम १२ अन्वये) (Period for filing of claims and objections), हा दिनांक ०३ डिसेंबर २०२५ (बुधवार) ते १८ डिसेंबर २०२५ (गुरुवार) असा निश्चित करण्यात आला आहे. या कालावधीमध्ये प्राप्त झालेल्या सर्व दावे व हरकती दिनांक ०५ जानेवारी, २०२६ पुर्वी निकाली काढण्यात येणार आहेत. अंतिम मतदार यादी प्रसिद्धी दिनांक १२ जानेवारी, २०२६ (सोमवार) असा निश्चित करण्यात आला असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.