कानपूर : उत्तर प्रदेश पोलिसांच्या यूपी-112 मध्ये तैनात असलेल्या कॉन्स्टेबल महेंद्र यांच्या आत्महत्येनंतर संपूर्ण पोलिस दलात खळबळ उडाली आहे. “प्रेमाचे दोन शब्द बोलली असतीस तर… दुसरं लग्न कर… मुलांची काळजी दादा-वहिनी घेतील” अशा वेदनादायी ओळी त्यांच्या सुसाईड नोटमध्ये आढळल्यानंतर कुटुंबीय आणि सहकाऱ्यांमध्ये हळहळ पसरली आहे."काहीतरी कमी पडलं असेल त्यामुळे मी हे जग सोडून जात आहे, माझ्या प्रिये (पत्नीला उद्देशून. प्रेमाचे दोन शब्द कधी तरी बोलली असती, तर.. तू लग्न कर, माझा भाऊ आणि वहिनी मुलांची काळजी घेतील. मला माफ कर." कॉन्स्टेबल महेंद्र यांच्या सुसाईड नोटमध्ये हे दुःख उघड होताच उत्तर प्रदेश पोलिसात हळहळ पसरली. ते कानपूर पोलिसांच्या यूपी 112 मध्ये तैनात होते. 2 डिसेंबर रोजी त्याने कल्याणपूर परिसरातील भाड्याच्या घरात गळफास घेतला. आत्महत्येनंतर, पोलिस आत्महत्या का केली याची उत्तरे शोधत होते.
२ डिसेंबर रोजी त्यांनी कल्याणपूरमधील भाड्याच्या घरात गळफास घेतला. आत्महत्येचे कारण शोधताना प्रथम पत्नीच्या जबाबात कर्जाचा मुद्दा पुढे आला. तिच्या म्हणण्यानुसार महेंद्र यांनी लाखोंचं कर्ज काढलं होतं आणि त्याच्या ताणातून त्यांनी आत्महत्या केली.
परंतु 12 तासांत चित्र बदललं.
महेंद्र यांचे धाकटे भाऊ देवकी नंदन यांनी पोलिसांना दिलेल्या सुसाईड नोटनंतर हे स्पष्ट झाले की आत्महत्येचं मूळ कारण कर्ज नसून वैवाहिक कलह आणि सासरकडील धमक्या होत्या. देवकी नंदन यांच्या मते, पत्नी कविता आणि तिच्या कुटुंबीयांसोबत सततचे वाद, त्यातून मिळणाऱ्या धमक्या आणि अपमानामुळे महेंद्र मानसिकदृष्ट्या खचले होते.
भाऊ म्हणाला,“मी महिनाभर त्याच्याशी बोलू शकलो नाही. २ डिसेंबरला मी त्याला २० वेळा फोन केला. तो अशांत होता… आणि नंतर बातमी आली की तो नाही.”त्यांनी हेही सांगितले की पत्नीने अनेक वेळा महेंद्रवर हात उचलला होता.ट्रंकमध्ये सापडलेली सुसाईड नोट महेंद्र यांच्या मनातील वेदनेचं प्रतिबिंब होती.त्यात त्यांनी पत्नीला घर तिचं असल्याचं सांगत पुन्हा प्रेमाचीच अपेक्षा व्यक्त केली. “काहीतरी कमी पडलं म्हणून मी हे जग सोडतोय… तू तरुण आहेस, लग्न कर…” असे लिहित त्यांनी आपल्या आयुष्याची जबाबदारी स्वतःवर घेतली.पूर्वीही दोनदा आत्महत्येचा प्रयत्न केलेला महेंद्र यांना भावाने वाचवले होते; मात्र तिसऱ्या वेळी तो 350 किलोमीटर दूर असल्याने पोहोचू शकला नाही.या प्रकरणावर पुढील तपास सुरू असून महेंद्र यांच्या मृत्यूमागील नेमक्या परिस्थितीचा तपशील पोलिस शोधत आहेत.