सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • प्रवाशांचे हाल, दिल्ली विमानतळावरुन रात्री 11.59 वाजेपर्यंतचे उड्डाण रद्द; इंडिगोचा माफीनामा, पॅसेंजरला आवाहन
  • भाजप देवाभाऊमय आहेच, पण राज्यातील इतर पक्षही देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यानेच चालतात; मंगलप्रभात लोढांचं खळबळजनक वक्तव्य
  • नगरपालिकांचे निकाल मागे-पुढे घेणार नाही, 21 तारखेलाच मतमोजणी, सुप्रीम कोर्टाचे निर्देश
 शहर

पुण्यात पीएमपीएमएल बस सेवेत महिलांसाठी मोफत प्रवास योजना लागू करण्याची मागणी

डिजिटल पुणे    05-12-2025 17:19:53

पुणे : पुण्यात पीएमपीएमएल  बस सेवेत महिलांसाठी मोफत प्रवास योजना लागू करण्याची मागणी आज इनक्रेडीबल समाज सेवक ग्रुपच्या शिष्टमंडळाने केली.इनक्रेडीबल समाज सेवक ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष असलम इसाक बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली सौ. मुबिन अहमद खान यांच्या नेतृत्वात दि. ५ डिसेंबर २०२५ रोजी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक  पंकज देवरे  यांच्यासोबत  चर्चा झाली. असलम इसाक बागवान, सौ.मुबिना खान, अहमद खान, सचिन आल्हाट तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.

मोटार वाहन अधिनियम १९८८ च्या कलम ६७ नुसार पुण्यातील महिलांसाठी पीएमपीएमएल बससेवेत मोफत प्रवास सुविधा लागू करण्याची मागणी या चर्चेत करण्यात आली.या चर्चेसाठी सादर करण्यात आलेल्या निवेदनात दिल्ली, चंदीगड, चेन्नई यांसारख्या महानगरांमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी उपलब्ध असलेल्या मोफत प्रवास योजनांचा उल्लेख करण्यात आला असून, पुणे शहरातही अशी योजना राबविण्याची तातडीची गरज असल्याचे नमूद करण्यात आले. 


विद्यार्थिनी, कामकाजी महिला, घरगुती कामगार आणि ज्येष्ठ महिला दररोज मोठ्या प्रमाणावर पीएमपीएमएल बससेवा वापरत असल्याने हा निर्णय अत्यंत उपयुक्त ठरेल, असेही निवेदनात म्हटले आहे.
मोटार वाहन अधिनियम १९८८ च्या कलम ६७ नुसार राज्य सरकार आणि परिवहन प्राधिकरणांना विशेष प्रवर्गातील नागरिकांना भाड्यात सवलत किंवा मोफत प्रवास सुविधा देण्याचा अधिकार आहे. पीएमपीएमएल हे PMC आणि PCMC अंतर्गत कार्यरत असल्याने महिलांसाठी विशेष प्रवास सुविधा लागू करण्याचा पूर्ण अधिकार त्यांच्याकडे आहे, यावरही निवेदनात भर देण्यात आला.
या चर्चेदरम्यान महिलांसाठी मोफत प्रवास सुविधा लागू करणे, त्यासाठी पास किंवा स्मार्ट कार्डसारखी सक्षम प्रणाली आणणे आणि बस तसेच बसस्टॉपवरील सुरक्षा उपाययोजना बळकट करणे या मुख्य मागण्या सादर करण्यात आल्या. महिलांच्या सुरक्षितता आणि सामाजिक न्यायाच्या दृष्टीने पीएमपीएमएल प्रशासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली.


 Give Feedback



 जाहिराती