सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी: पुण्यात महापालिका निवडणुकीत दोन राष्ट्रवादी एकत्र येणार नाहीत; शरद पवारांची माहिती, प्रशांत जगतापांशी सखोल चर्चा
  • पुण्यात आजही 42 विमानं रद्द, मुंबई-पुणे तिकिटाची किंमत एक लाख, व्हीआयपींना मुंबई विमानतळावरच रात्र काढण्याची वेळ; प्रवाशांचे प्रचंड हाल
  • अजित पवारांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा बहरीनमध्ये संपन्न,
  • प्रवाशांचे हाल, दिल्ली विमानतळावरुन रात्री 11.59 वाजेपर्यंतचे उड्डाण रद्द; इंडिगोचा माफीनामा, पॅसेंजरला आवाहन
 जिल्हा

जागतिक दिव्यांग दिनानिमित्त विलेपार्ले येथे सांस्कृतिक कार्यक्रम

डिजिटल पुणे    06-12-2025 10:39:02

मुंबई : प्रतिभावान दिव्यांग कलाकारांना एक अर्थपूर्ण व सर्जनशील मंच उपलब्ध करून देणे तसेच त्यांच्या कलागुणांचा समाजापुढे गौरवपूर्ण परिचय करून देणे, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांनी ३ डिसेंबर या जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विलेपार्ले येथे  ३ डिसेंबर रोजी प्रतिभावान दिव्यांग कलावंतांचा ‘स्वर-पंख’ या चित्रपट गीतांच्या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

स्वर-पंख हे शीर्षक असलेला व “वो सुर जो उड़ान देते हैं, अपने पंख ख़ुद बनाकर” ही टॅगलाइन असलेला हा कार्यक्रम संगीत संयोजक, सर्व गायक, वादक हे प्रतिभावान (दृष्टिहीन आणि गतिशीलता) दिव्यांग कलावंत यांनी सादर केला. त्यामध्ये संगीत संयोजन बिपिन वर्तक, गायक- बिपिन वर्तक, विनोद गावडे, आफताब ठाकूर, मकरंद भोसले, सारिका शिंदे, श्रध्दा, गौरी तसेच प्रमुख वादक संतोष मोहिते, नागेश कांबळे यांचा सहभाग लाभला.

या कार्यक्रमास सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड.आशिष शेलार यांनी विशेष उपस्थिती लावली. यावेळी बोलताना त्यांनी स्वरपंख हा एक आगळा-वेगळा कार्यक्रम असून यामध्ये अतिशय प्रभावशाली दिव्यांग कलाकार सहभागी झालेले आहेत. दिव्यांग बंधू भगिनी यांना ईश्वराने विशेष शक्ती दिलेली असून ती वेगवेगळ्या स्वरूपात बाहेर येत असते. तीच शक्ती संगीत आणि गीताच्या माध्यमातून आज आपणाला दिसत आहे. दिव्यांग कलाकार आणि सामान्य माणूस एकच असून एकसमान गतीने चालले पाहिजे त्यासाठी कला हे एक माध्यम असल्याचे ते म्हणाले. सांस्कृतिक कार्य विभागार्फत राज्यभरात १२०० सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत, असे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.या कार्यक्रमाचे संयोजन अतुल साटम, कनक क्रिएशन यांनी केले. ” स्वर- पंख” या कार्यक्रमाची संकल्पना सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांची असून या कार्यक्रमास सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ.किरण कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले. दिव्यांग कलावंतांच्या या अद्वितीय संगीत कार्यक्रमास प्रेक्षकांनी भरघोस प्रतिसाद दिला.


 Give Feedback



 जाहिराती