सरकारने विमान प्रवासी भाड्यावर लावलेल्या मर्यादांवरील आदेश (Order No. 01/2025, दिनांक 6 डिसेंबर 2025) ना.मुरलीधर मोहोळ संदर्भात प्रतिक्रिया
“ऐनवेळी विमान रद्द होणे, सणासुदीचा कालावधी आणि सुट्ट्यांमध्ये विमान कंपन्या प्रवासी भाड्यात मनमानी पद्धतीने वाढ करतात. सर्वसामान्य प्रवाशांचे कुठलेही आर्थिक नुकसान होऊ नये आणि हवाई वाहतुकीची सुविधा उपलब्ध व्हावी या उद्देशाने नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने प्रवासी भाड्यावर मर्यादा लावण्याचा निर्णय घेतला आहे. ५०० ते १५०० किलोमीटर व त्यापुढील अंतरासाठी ठरवलेल्या कमाल भाड्याच्या मर्यादा लागू केल्यामुळे हवाई प्रवास प्रवाशांच्या आवाक्यात राहील आणि प्रवाशांची अनिश्चितता थांबेल. प्रवाशांचे हित आणि सुरक्षितता हेच आमचे सर्वोच्च प्राधान्य असून, आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने करण्यात येतील.”
