पुणे :उत्कृष्ट सामाजिक सेवा आणि समाजहिताच्या कार्यासाठी शांतीदूत परिवाराला ‘तितीक्षा अग्रेसर संस्था पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले.तसेच सौ. विद्या ताई जाधव (संस्थापक अध्यक्षा, शांतीदूत परिवार) आणि डॉ. विठ्ठल जाधव IPS (विशेष पोलिस महानिरीक्षक, से.नि.) यांना ‘तितीक्षा समाज कोहिनूर दांपत्य पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आले.हा पुरस्कार पद्मश्री गिरीश प्रभुणे, पद्मश्री उदय देशपांडे आणि महामंडलेश्वर कृष्णदेव गिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, बावधन, पुणे येथील सभागृहात तितीक्षा इंटरनॅशनल पुणेच्या दशकपूर्ती निमित्त हा भव्य कार्यक्रम पार पडला.

उत्कृष्ट सामाजिक सेवा कार्यासाठी शांतीदूत परिवाराचा पुरस्कार देऊन गौरव पद्मश्री गिरीश प्रभुणे, पद्मश्री उदय देशपांडे व महामंडलेश्वर कृष्णदेव गिरीजी महाराज यांचे शुभ हस्ते शांतीदूत परिवार तितीक्षा अग्रेसर संस्था पुरस्काराने सन्मानित व सौ विद्या ताई जाधव संस्थापक अध्यक्षा शांतीदूत परिवार व डॉ. विठ्ठल जाधव IPS विशेष पोलिस महानिरीक्षक महाराष्ट्र राज्य से. नि. यांना तितीक्षा समाज कोहिनूर दांपत्य पुरस्काराने गौरवण्यात आले. आज दिनांक 7 डिसेंबर रोजी रविवारी सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट बावधन पुणे येथील सभागृहात तितीक्षा इंटरनॅशनल पुणे या संस्थेच्या दशकपूर्ती निमित्त वरील पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आले.

शांतीदूत परिवार तितीक्षा अग्रेसर संस्था हा पुरस्कार शांतीदूत अभिनेते सिद्धेश्वर झाडबुके, डॉ. मधुसूदन घाणेकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व सल्लागार डॉ. प्रीती काळे , सौ.सुवर्णा ताई जाधव अभिनेत्री व पुणे शांतीदूत परिवार महिला विभाग अध्यक्षा रोहिणी कोळेकर, विजय ठुबे राष्ट्रीय अध्यक्ष शेतकरी शांतीदूत परिवार, मधुकर चौधरी अध्यक्ष शांतीदूत परिवार शिवाजीनगर, महादेव जाधव अध्यक्ष शांतीदूत परिवार नऱ्हे, अकबर मेनन महाराष्ट्र अध्यक्ष शांतीदूत पोलिस मित्र परिवार, सदानंद बेलसरे पोलिस उपअधीक्षक से.नि.व पदाधिकारी शांतीदूत परिवार ,शिवराम मदने नितीन दुधाटे,सौ.विद्या ताई जाधव संस्थापक अध्यक्षा शांतीदूत परिवार, डॉ विठ्ठल जाधव IPS विशेष पोलिस महानिरीक्षक महाराष्ट्र राज्य से.नि.व अनेक उपस्थित शांतीदूत परिवार सदस्य यांनी पद्मश्री गिरीश प्रभुणे, पद्मश्री उदय देशपांडे महामंडलेश्वर कृष्णदेव गिरी जी महाराज यांचे हस्ते स्वीकारला. वरील पुरस्कारासाठी शांतीदूत परिवाराची व जाधव दांपत्याची निवड करून सन्मानित केले बदल डॉ विठ्ठल जाधव IPS विशेष पोलिस महानिरीक्षक महाराष्ट्र राज्य से.नि यांनी कृतज्ञता व्यक्त केली, तितीक्षा इंटरनॅशनल पुणे च्या अध्यक्षा व संपूर्ण तितीक्षा टीम चे आभार मानले व संस्थेच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

संपूर्ण शांतीदूत परिवार पदाधिकारी, स्नेही, हितचिंतक यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले. भविष्यात ही शांतीदूत परिवार संस्था राष्ट्रभक्ती, शांतता, धार्मिक सलोखा, मानव सेवा व निसर्ग सेवा कार्य अधिक प्रभावीपणे करेल या साठी कटिबद्ध राहू या.संस्था भविष्यातही राष्ट्रभक्ती, शांतता, धार्मिक सलोखा, मानवसेवा आणि निसर्गसेवा ही कार्ये अधिक प्रभावीपणे करण्यास कटिबद्ध राहणार असल्याचे सांगण्यात आले.
