सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • गोरेगावातील जनतेसाठी नवी आशा, समाजसेवक संदीप जाधव यांच्यामुळे पाणीटंचाई आणि अंधाराचा प्रश्न सुटला
  • मस्साजोगमध्ये आजपासून 9 डिसेंबर काळा दिवस म्हणून पाळणार; अधिवेशनामध्ये संतोष देशमुख प्रकरणावर निवेदन दिलं जावं; धनंजय देशमुखांची मागणी
  • स्ट्राँग रुममध्ये EVM चा संशयास्पद आवाज, दोन्ही शिवसेनेचा आक्षेप, गोंधळानंतर आजपासून खडा पहारा
  • फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
  • उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; ZP अन् पंचायत समितीचा आढावा, मनसेबाबतही सूचना
 शहर

भेलके महाविद्यालयात शांतता पुणेकर वाचत आहेत उपक्रम साजरा

डिजिटल पुणे    10-12-2025 10:29:07

पुणे : भारत सरकार च्या National Book Trust of India तर्फे पुण्यामध्ये दि.१३ डिसेंबर ते २१ डिसेंबर दरम्यान फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे येथे "पुणे पुस्तक महोत्सव" चे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, चर्चासत्रे, साहित्यिकांच्या मुलाखती, सृजनशीलतेला वाव देणारे तसेच वाचन संस्कृती जपणारे कार्यक्रम आयोजित केले आहेत. ह्या सर्व कार्यक्रमांबरोबरच एक नाविन्यपूर्ण कार्यक्रम " शांतता, पुणेकर वाचत आहेत" आपण जिथे असाल तिथे आपल्या आवडीचे पुस्तक वाचन करणे हा उपक्रम शासनाने घेण्यास महाविद्यालयास कळविले होते.

 त्यानुसार शंकरराव भेलके महाविद्यालय, नसरापूर येथे  दि. ०९  डिसेंबर २०२५ ठीक ११ ते १२ वाजेपर्यंत महाविद्यालयातील ग्रंथालयामध्ये  " शांतता, पुणेकर वाचत आहेत" हा उपक्रम महाविद्यालयातील ग्रंथालय विभागातर्फे राबविण्यात आला. सदर उपक्रमात महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या आवडीचे पुस्तक वाचन केले वाचनाच्या साहित्यामध्ये कथा, कादंबऱ्या, चरित्रे, स्पर्धा परीक्षा व इतर अवांतर साहित्य उपलब्ध होते. उपक्रमाचे आयोजन ग्रंथपाल प्रा.भगवान गावित, एन.एस.एस. अधिकारी प्रा.दयानंद जाधवर, सुमित कांबळे यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.तुषार शितोळे यांच्या मार्गदर्शखाली केले.


 Give Feedback



 जाहिराती