सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • गोरेगावातील जनतेसाठी नवी आशा, समाजसेवक संदीप जाधव यांच्यामुळे पाणीटंचाई आणि अंधाराचा प्रश्न सुटला
  • मस्साजोगमध्ये आजपासून 9 डिसेंबर काळा दिवस म्हणून पाळणार; अधिवेशनामध्ये संतोष देशमुख प्रकरणावर निवेदन दिलं जावं; धनंजय देशमुखांची मागणी
  • स्ट्राँग रुममध्ये EVM चा संशयास्पद आवाज, दोन्ही शिवसेनेचा आक्षेप, गोंधळानंतर आजपासून खडा पहारा
  • फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
  • उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; ZP अन् पंचायत समितीचा आढावा, मनसेबाबतही सूचना
 शहर

अण्णासाहेब मगर महाविद्यालयात शांतता पुणेकर वाचत आहेत! या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

डिजिटल पुणे    10-12-2025 10:32:49

पुणे : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयात राष्ट्रीय पुस्तक ट्रस्ट आयोजित पुणे पुस्तक महोत्सव अंतर्गत  "शांतता पुणेकर वाचत आहेत!" या उपक्रमास विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांनी उत्फुर्त प्रतिसाद देत सहभाग घेतला. या उपक्रमास महाराष्ट्र शासन युवा धोरण समितीचे सदस्य डॉ. शंतनू जगदाळे, सामाजिक कार्यकर्ते राहुल तुपे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नितीन घोरपडे यांनी "शांतता पुणेकर वाचत आहेत" या उपक्रमाबद्दल आणि पुणे पुस्तक महोत्सवा संबंधी माहिती दिली. आणि वाचनाचे फायदे सांगितले.

या उपक्रमात महाविद्यालयातील विविध विभागाचे तीन हजार सातशे सतरा विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. पुस्तक वाचनाचे अकारा कार्यक्रम झाले. महाविद्यालय ग्राउंड, वाणिज्य सेमिनार हॉल,शिवाजी सभागृह, सांस्कृतिक हॉल, व्यावसायिक विभाग, अण्णासाहेब मगर पुतळा परिसर,अभ्यासिका अशा विविध ठिकाणी तसेच दत्तक गाव सुकलवाडी येथे वाचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दत्तक गाव सुकलवाडी येथील सरपंच संदेश पवार,

ग्रामसेवक शालिनी जगदाळे यांच्यासह ग्रामस्त तसेच मगरपट्टा सिटीयेथे माजी उपमहापौर निलेश मगर यांच्यासह सायबर सिटीतील कर्मचारी व नागरिकांना या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.या प्रसंगी उपप्राचार्य डॉ. प्रशांत मुळे, डॉ. गंगाधर सातव, डॉ. लतेश निकम, प्रा.अनिल जगताप, प्रा. गजाला सय्यद, डॉ. सविता कुलकर्णी, डॉ. दत्तात्रय संकपाळ, डॉ. दत्तात्रय टिळेकर, डॉ. नाना झगडे, डॉ. अशोक ससाणे, डॉ. गणेश गांधीले, डॉ. धीरज देशमुख आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. लतेश निकम यांनी केले तर आभार डॉ. प्रशांत मुळे यांनी मानले.


 Give Feedback



 जाहिराती