सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पूरपरिस्थितीत मुख्यमंत्री सहायता निधीत 1 अब्ज रुपयांची मदत, शेतकऱ्यांना दिले फक्त 75 हजार; आरटीआयमधून धक्कादायक माहिती समोर, सतेज पाटील अंबादास दानवेंनी फटकारलं
  • महाराष्ट्र-गुजरात सीमा निश्चित करण्याबाबत हालचाली; पालघरच्या तलासरीत गुजरातच्या घुसखोरीचा आरोप, दोन्ही राज्यांकडून संयुक्त मोजणी सुरू
  • हायकोर्टाच्या आदेशानंतरही गेल्या आठ वर्षात 6 लाख 56 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभच नाही; सरकारनेच दिली कबुली
 जिल्हा

राज्यपाल आचार्य देवव्रत यांची देवलापार गो-विज्ञान संशोधन केंद्रास भेट

डिजिटल पुणे    10-12-2025 17:22:13

नागपूर  : राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज देवलापार येथील गो-विज्ञान संशोधन केंद्रास भेट दिली. यावेळी गो विज्ञान केंद्राच्या कामाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.यावेळी वित्त व नियोजन राज्यमंत्री  ॲड. आशिष जयस्वाल, गो-विज्ञान संशोधन केंद्राचे अध्यक्ष पद्मेश गुप्ता, कोषाध्यक्ष हितेंद्र चोपकर आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

यावेळी राज्यपाल देवव्रत यांनी येथील कामधेनू पंचगव्य आयुर्वेद भवनची पाहणी केली. अवलेह विभाग, वटी, तेल, इंधन, सिरप, प्रयोगशाळा आदींना भेट दिली. येथे निर्माण होणारे फलघृत, हिंग्वाद्यघृत, अष्टमंगलघृत, गांडूळ खत निर्मिती प्रक्रिया, गोमूत्र अर्क, दंतमंजन आदी 30 पेक्षा जास्त उत्पादनांची माहितीही त्यांनी घेतली. यावेळी संशोधन केंद्राच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

रामटेक तालुक्यातील देवलापार येथील गोविज्ञान संशोधन केंद्राने देशी गोवंशाचा विकास हे प्रमुख उद्दिष्ट ठेवले आहे. दुधाएवढेच शेण आणि गोमूत्र हे घटकही महत्त्वाचे असून ते उत्पन्नाचा भक्‍कम पर्याय ठरू शकतात हेच संस्थेने विविध प्रकल्पांच्या अंमलबजावणीतून सिध्द केले आहे. त्याच दृष्टीने देशपातळीवरील संस्थांशी तंत्रज्ञानाबाबत करार करून विविध उत्पादने तयार केली आहेत. काही उत्पादनांना आंतरराष्ट्रीय पेटंटही मिळवण्यात संस्था यशस्वी ठरली आहे.

 

 


 Give Feedback



 जाहिराती