सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पूरपरिस्थितीत मुख्यमंत्री सहायता निधीत 1 अब्ज रुपयांची मदत, शेतकऱ्यांना दिले फक्त 75 हजार; आरटीआयमधून धक्कादायक माहिती समोर, सतेज पाटील अंबादास दानवेंनी फटकारलं
  • महाराष्ट्र-गुजरात सीमा निश्चित करण्याबाबत हालचाली; पालघरच्या तलासरीत गुजरातच्या घुसखोरीचा आरोप, दोन्ही राज्यांकडून संयुक्त मोजणी सुरू
  • हायकोर्टाच्या आदेशानंतरही गेल्या आठ वर्षात 6 लाख 56 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभच नाही; सरकारनेच दिली कबुली
 जिल्हा

बनावट वेबसाईटस्‌, ॲप आणि खोट्या ई-चालान लिंकपासून सावध राहा ;परिवहन विभागाचे नागरिकांना आवाहन

डिजिटल पुणे    10-12-2025 18:05:20

मुंबई : राज्यातील वाहनधारक आणि चालकांची आर्थिक फसवणूक वाढल्याच्या पार्श्वभूमीवर परिवहन विभागाने बनावट वेबसाईटस्‌, संशयास्पद मोबाईल ॲप्स (एपीके) आणि खोट्या ई-चालान लिंकपासून सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी, ई-चालान यांसारख्या सेवांच्या नावाखाली अनेक नागरिकांची वैयक्तिक माहिती व आर्थिक व्यवहारांची फसवणूक होत असल्याचे परिवहन विभागाच्या निदर्शनास आले आहे.

परिवहन विभागाने सांगितले आहे की, फसवणूक करणारे मोबाईल एसएमएस किंवा व्हॉट्सॲप संदेशांद्वारे ‘चलन बाकी आहे’, ‘परवाना सस्पेंड होणार आहे’ अशा धमकीपर संदेशांसह अनधिकृत पेमेंट लिंक पाठवून पैसे उकळण्याचा प्रयत्न करत आहेत. परिवहन विभागाने याबाबत स्पष्ट सांगितले की, आरटीओ कार्यालय किंवा परिवहन विभाग नागरिकांना कधीही व्हॉट्सअॅप वरून पेमेंट लिंक पाठवत नाही. तसेच ‘RTO Services.apk’, ‘mParivahan_Update.apk’, ‘eChallan Pay.apk’ अशी अज्ञात एपीके फाईल्स डाउनलोड केल्यास मोबाईलमधील ओटीपी, बँकिंग माहिती आणि इतर संवेदनशील माहिती चोरी होण्याचा धोका आहे.

नागरिकांनी VAHAN – (वाहन नोंदणी) https://vahan.parivahan.gov.in, SARATHI (ड्रायव्हिंग लायसन्स सेवा) https://sarathi.parivahan.gov.in, परिवहन सेवा पोर्टल https://www.parivahan.gov.in  तसेच ई-चालान पोर्टल ,https://echallan.parivahan.gov.in  या gov.in डोमेनच्या अधिकृत सरकारी संकेतस्थळांचाच वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे .com, .online, .site, .in किंवा इतर कोणत्याही डोमेनवरील वेबसाइटवर वाहनधारकांनी माहिती नोंदवू नये. कोणताही संशयास्पद संदेश किंवा लिंक प्राप्त झाल्यानंतर तात्काळ नॅशनल सायबर क्राईम पोर्टलचे https://www.cybercrime.gov.in, सायबर फसवणूक हेल्पलाइन क्रमांक १९३० किंवा जवळचे जिल्हा सायबर पोलीस स्टेशन या ठिकाणी तक्रार नोंदवावी, असे आवाहन सह परिवहन आयुक्त (संगणक) शैलेश कामत यांनी केले आहे.


 Give Feedback



 जाहिराती