नागपूर : विधानसभेत नगरविकास, पाणी पुरवठा व गृहनिर्माण विभागाच्या सन 2025-26 च्या पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या.पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत पुरवणी मागण्या मांडल्या.विधानसभेत नगरविकास विभागाच्या सन 2025-26 या वर्षाच्या एकूण 9 हजार 195 कोटी 76 लाख 58 हजार रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या.पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या 196 कोटी 57 लाख 17 हजार रुपयांच्या मागण्याना मंजुरी देण्यात आली.गृहनिर्माण विभागाच्या 91.9 कोटींच्या मागण्या यावेळी मंजूर करण्यात आल्या. पुरवणी मागण्याच्या चर्चेत विधानसभेतील विविध सदस्य सहभागी झाले होते.