सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पूरपरिस्थितीत मुख्यमंत्री सहायता निधीत 1 अब्ज रुपयांची मदत, शेतकऱ्यांना दिले फक्त 75 हजार; आरटीआयमधून धक्कादायक माहिती समोर, सतेज पाटील अंबादास दानवेंनी फटकारलं
  • महाराष्ट्र-गुजरात सीमा निश्चित करण्याबाबत हालचाली; पालघरच्या तलासरीत गुजरातच्या घुसखोरीचा आरोप, दोन्ही राज्यांकडून संयुक्त मोजणी सुरू
  • हायकोर्टाच्या आदेशानंतरही गेल्या आठ वर्षात 6 लाख 56 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभच नाही; सरकारनेच दिली कबुली
 जिल्हा

वनसेवा मुख्य परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांना मुलाखत तयारीसाठी ‘आर्टी’तर्फे आर्थिक सहाय्य

डिजिटल पुणे    11-12-2025 17:23:19

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ‘वनसेवा मुख्य परीक्षा-२०२४’ उत्तीर्ण झालेल्या अनुसूचित जातीच्या मातंग व त्यातील तत्सम उमेदवारांना मुलाखतीच्या तयारीसाठी अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी) मार्फत १० हजार रुपये आर्थिक सहाय्य योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेसाठी पात्र असलेल्या उमेदवारांना १० हजारांचे एकरकमी आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. मुलाखतीसाठी पात्र झालेल्या उमेदवारांनी लाभ घेण्याचे आवाहन आर्टीचे व्यवस्थापकीय संचालक सुनील वारे यांनी केले आहे.मुलाखतीची तयारी अधिक प्रभावीपणे करता यावी आणि उमेदवारांवरील आर्थिक ताण कमी व्हावा, हा आर्थिक सहाय्य या योजनेमागचा मुख्य उद्देश आहे.या संदर्भातील सविस्तर जाहिरात आणि ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया ‘आर्टीच्या’ अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

अधिक माहितीसाठी:

उमेदवारांनी ‘आर्टी’च्या http:// https://arti.org.in या संकेतस्थळाला भेट देवून NOTICE BOARD या लिंकवर तपशील पहावा, तसेच अर्ज भरण्यासाठी  https://forms.gle/BSh7vMVDNonGK4C18 या लिंकवर गुगल फार्म भरावा.

 

 


 Give Feedback



 जाहिराती