उरण : ओ.एन.जी.सी.,उरण प्लांट पुरस्कृत आणि ओ.एन.जी.सी.स्थानीय लोकाधिकार समिती व ओ.एन.जी.सी (WOU) कर्मचारी संघटना, उरण यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १०/१२/२०२५ रोजी संपन्न झालेल्या रक्तदान शिबीरामध्ये एकूण १०४६ रक्तदात्यांनी नोंदणी केली व त्यामधून १००८ युनिट विक्रमी रक्तदान झाले.
गेल्या वर्षी १३/१२/२०२४ रोजी पार पडलेल्या रक्तदान शिबिरामध्ये १११५ युनिट रक्त संकलनाचा विक्रम करण्यात आला होता.या शिबिरामध्ये नवी मुंबई (विशेषतः उरण परिसरातील) ,मुंबई व ठाणे जिल्ह्यातील रक्तदात्यांनी रक्तदान केले.या सामाजिक उपक्रमात एम.जी.एम. हॉस्पिटल - नवी मुंबई,अपोलो हॉस्पिटल - नवी मुंबई, टाटा मेमोरियल हॉस्पिटल - नवी मुंबई,ज्युपिटर हॉस्पिटल - ठाणे, नायर हॉस्पिटल - मुंबई ,हिंदुजा हॉस्पिटल - मुंबई, यांनी सहकार्य केले.
या रक्तदान शिबिरात सहभागी झालेले कर्मचारी संघटनेचे सर्व आजी- माजी पदाधिकारी,सभासद, गार्डनिंग कर्मचारी, ॲम्बुलन्स कर्मचारी व इतर कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक आभार.आज पार पडलेल्या रक्तदान शिबीराचे ३७ वे वर्ष असून,आजही विक्रमी रक्तदान झाले. या सामाजिक उपक्रमात संघटनेच्या प्रत्येक कार्यकर्त्याचे अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान लाभले आहे.सर्व रक्तदात्यांच्या व कार्यकर्त्यांच्या योगदानाबद्दल मनःपूर्वक आभार असे मत व्यक्त करत आयोजकांनी सर्वांचे आभार मानले आहेत.रक्तदान शिबीरा सारख्या सामाजिक उपक्रमात सहभागी होऊन रक्तदात्यांनी दिलेल्या प्रचंड प्रतिसादामुळे '१००८ युनिट ची ' विक्रमी नोंद झाली आहे.सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ओ.एन.जी.सी.,उरण व्यवस्थापनाचे अत्यंत महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले आहे.
या रक्तदान शिबीर प्रसंगी उमेशा सोंदकूर (मुख्य महाव्यवस्थापक सयंत्र व्यवस्थापक उरण ), संजीव कुमार मोहन (मुख्य महाव्यवस्थापक (उत्पादन)आधारभूत सेवा, मनिष मेहता (महाव्यवस्थापक वित्त आणि लेखा विभाग ), श्रीमती भावना आठवले (महा व्यवस्थापक प्रभारी मानव संसाधन )यांची प्रमुख उपस्थिती होती.कर्मचारी संघटनेचे वरीष्ठ उपाध्यक्ष पराग कदम, कार्याध्यक्ष संदिप गावडे, सरचिटणीस प्रदिप मयेकर, उपाध्यक्ष उज्जेश तुपे, सचिव-बाळकृष्ण काशिद,सचिव दिलीप आरदाळकर,संघटक सचिव नितीन गवळी यांच्यासह कर्मचारी संघटनेचे सर्वच पदाधिकारी सदस्यांनी विशेष मेहनत घेतली आहे.