उरण : आवाज महामुंबईचा चॅनेल चा पहिला वर्धापन दिन बुधवार दिनांक दहा डिसेंबर रोजी चिरनेर येथील मानसी फार्म येथे मोठ्या दिमाखात आणि उत्साहात संपन्न झाला.यावेळी अनेक मान्यवर आणि आवाज महामुंबईचा चॅनेल चे राज्यभरातील पत्रकार आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.संपादक मिलिंद खारपाटील आणि मी खूप जुने मित्र आहोत. ते पत्रकार,लेखक ,कवी, गुणवंत कामगार असे अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे आहेत. त्यांचे आवाज महामुंबईचा चॅनेल हे चालत नाही तर वेगाने पळत आहे.वाऱ्याच्या वेगाने चॅनेलवर अचूक बातम्या येत असून हे चॅनेल सर्वात वेगवान असल्याचे त्यांनी सांगितले. एका वर्षातील प्रगती पाहिली तर भविष्यात हे चॅनेल महाराष्ट्र राज्यातील अग्रगण्य चॅनेल होईल असे कार्यक्रमाचे अध्यक्ष कामगार नेते महेंद्र घरत यांनी म्हटले.
योग्य ,अचूक आणि वेगवान बातमीबद्दल डॉ मेधा किरीट सोमैया यांनी संपादक मिलिंद खारपाटील यांचे कौतुक केले. शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांची स्वराज्याची प्रेरणा घेऊन सर्व पत्रकारांना सोबत घेऊन हे चॅनेल सुरू केल्याची माहिती त्यांनी दिली.या कार्यक्रमात उद्घाटक राजाशेठ खारपाटील, शेलार मामा यांचे वंशज उद्योजक गणपत शेलार, शिवसेना नवी मुंबई उपजिल्हाप्रमुख मनोज इसवे,नानक साई फाऊंडेशन चे प्रमुख पंढरीनाथ बोकारे, सिने अभिनेत्री अर्चना गोमे, सिने अभिनेत्री प्रज्ञा म्हात्रे, रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अरविंद पाटील, जनशिक्षण संस्थान रायगड चे संचालक विजय कोकणे,रयत शिक्षण संस्था रायगड चे माजी अधिकारी रोहिदास ठाकूर,चाईल्ड केअर संस्थेचे अध्यक्ष विकास कडू,चिरनेर चे माजी सरपंच पद्माकर फोफेरकर,सामाजिक कार्यकर्ते विद्याधर ठाकूर, आगरी समाज परिषदेच्या उरण तालुकाध्यक्षां सीमा घरत, पत्रकार धम्मशील सावंत आदी मान्यवरांनी त्यांच्या भाषणातून चॅनेलसाठी शुभेच्छा दिल्या.नानक साई फाऊंडेशन.. घुमान यात्रा यांच्याकडून संपादक मिलिंद खारपाटील यांना संत नामदेव जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
आगरी समाज परिषदेच्या उरण तालुका अध्यक्षा सीमा घरत यांनी संपादक मिलिंद खारपाटील यांची आगरी समाज परिषदेच्या उरण तालुका चिटणीस पदी निवड जाहीर केली.या कार्यक्रमात उद्योगपती राजाशेठ खारपाटील यांचा ६२ वा वाढदिवस साजरा करण्यात आला.या कार्यक्रमात धीरेंद्र ठाकूर ,रत्नप्रभा बेल्हेकर, प्रतीक्षा चव्हाण, डॉ विकासकुमार, डॉ देविदास बामणे, कृष्णा कदम, शिवराम उतेकर,उत्तमकुमार कडवे यांना उल्लेखनीय कार्याबद्दल आवाज महामुंबईचा सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित केले.राजेश सोंडकर, प्रकाश कदम, धनराज गोपाळ, कृष्णा भोसले, सचिन घबाडी,अनंत नारंगीकर, संदेश पाटील,विनायक पाटील ,मंगल खारपाटील यांना आवाज महामुंबईचा पत्रकारिता सन्मान देऊन सन्मानित करण्यात आले.
उत्तमकुमार कडवे आणि सिमरन मोकल यांच्या सुमधुर गाण्यांनी कार्यक्रमात एक विशिष्ट उंची गाठली होती.कार्यक्रमात धीरेन ठाकूर यांचे अंगावर रोमांच उभे करणारे शिवव्याख्यान झाले.यावेळी उपस्थित पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांकडून छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवराय अशा घोषणा देण्यात आल्या. सुंदर अशा मानसी फार्म वर उपस्थित पत्रकारांनी छान अशी फोटोग्राफी केली.आवाज महामुंबईचा चॅनेल च्या वर्धापन दिनासाठी चॅनलचे पत्रकार सचिन घबाडी यांनी मानसी फार्म उपलब्ध करून दिला.प्रास्ताविक शिक्षक संजय होळकर यांनी केले.संपादकीय मनोगत मिलिंद खारपाटील यांनी व्यक्त केले.आभार सुदर्शन जाधव यांनी मानले.