सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी: मुंबईतील मुस्लिम बहुल भागात एकनाथ शिंदेंना पसंती; भाजपाचा सर्व्हे आला समोर
  • पूरपरिस्थितीत मुख्यमंत्री सहायता निधीत 1 अब्ज रुपयांची मदत, शेतकऱ्यांना दिले फक्त 75 हजार; आरटीआयमधून धक्कादायक माहिती समोर, सतेज पाटील अंबादास दानवेंनी फटकारलं
  • महाराष्ट्र-गुजरात सीमा निश्चित करण्याबाबत हालचाली; पालघरच्या तलासरीत गुजरातच्या घुसखोरीचा आरोप, दोन्ही राज्यांकडून संयुक्त मोजणी सुरू
  • हायकोर्टाच्या आदेशानंतरही गेल्या आठ वर्षात 6 लाख 56 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभच नाही; सरकारनेच दिली कबुली
 राज्य

दिल्लीत सुरू होणाऱ्या ‘महाराष्ट्र खाद्य महोत्सव’ची तयारी अंतिम टप्प्यात; निवासी आयुक्त आर. विमला यांनी केली पाहणी

डिजिटल पुणे    12-12-2025 18:34:46

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदनात शुक्रवार 12 डिसेंबर पासून सुरू होणाऱ्या तीन दिवसीय “महाराष्ट्र खाद्य महोत्सव-2025” ची सर्व तयारी पूर्ण झाली असून, महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त तथा सचिव श्रीमती आर. विमला यांनी महोत्सव स्थळाची पाहणी करून व्यवस्थेचा आढावा घेतला.या पाहणीदरम्यान त्यांनी स्वयंपाकघर, स्टॉल्स, सांस्कृतिक कार्यक्रमांचे रंगमंच तसेच बालकांसाठी असलेल्या करमणूक विभागाची पाहणी करून सूचना दिल्या.

12 ते 14 डिसेंबर या कालावधीत कस्तुरबा गांधी मार्गावरील महाराष्ट्र सदनात हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. उद्घाटन प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय शेफ विष्णू मनोहर यांच्या उपस्थितीत होणार आहे. महाराष्ट्रातील विविध प्रांतांच्या खाद्यपदार्थांची मेजवानी येथे मिळणार आहे. सावजी मटण रस्सा, मालवणी सीफूड, कोल्हापुरी तांबडा-पांढरा रस्सा, मिसळ पाव, पुरणपोळी, शेव भाजी, नान कालिया, तर्री पोहे अशा अनेक पारंपरिक पदार्थांचा समावेश असेल.तसेच सातारा, कोल्हापूर, जळगाव, पुणे, अमरावती आणि रायगड जिल्ह्यातील महिला स्वयंसहाय्यता समूह आपले खास घरगुती पदार्थ घेऊन येत असून, त्यांचे स्टॉल्सही  सजले आहेत.


 Give Feedback



 जाहिराती