सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • विरोधी पक्षनेता दोन्ही सभागृहात नाही याची सत्ताधाऱ्यांना लाज वाटली पाहिजे, राहुल गांधींमुळे भाजपचे धिंडवडे निघत असल्याने तुम्ही घाबरता; संजय राऊतांचा घणाघात
  • वंदे मातरमवर तावातावाने चर्चा करणाऱ्या केंद्र सरकारला... मनसेप्रमुख राज ठाकरे संतापले, स्पष्टच सुनावलं
  • आता संघर्ष थांबायला हवा, रायगडचा राजकीय वणवा शमवण्यासाठी अजित पवार मैदानात; तटकरे-गोगावले वाद मिटणार?
  • उमेदवार देण्यासाठी भाजप पदाधिकारी अन् स्थानिक नेत्यांची दमछाक; 125 जागांसाठी भाजपने कंबर कसली, 2500 उमेदवारांच्या मुलाखती आजपासून सुरू
 जिल्हा

हिवाळी अधिवेशनासाठी माहिती विभागाचा अभिनव उपक्रम ए.आय. चॅटबॉटद्वारे ‘दूरध्वनी पुस्तिका’ आता अधिक सुलभ

डिजिटल पुणे    13-12-2025 11:25:59

नागपूर : महाराष्ट्र विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे सुलभ, जलद आणि अचूक माहिती उपलब्ध करून देण्यासाठी अत्याधुनिक ए.आय. चॅटबॉट विकसित करण्यात आला आहे. पारंपरिक दूरध्वनी पुस्तिकेला डिजिटल आणि संवादक्षम स्वरूप देणाऱ्या या चॅटबॉटमुळे नागरिक, प्रसारमाध्यम प्रतिनिधी तसेच शासकीय अधिकाऱ्यांना आवश्यक माहिती फक्त प्रश्न विचारून तात्काळ मिळू शकणार आहे.

हा अभिनव ए.आय. चॅटबॉट विकसित करणारे इंजीनियरिंग कॉलेजचे विद्यार्थी आदित्य जाधव व आदित्य दहरवाल यांचा आज माहिती व जनसंपर्क विभागाचे संचालक डॉ. गणेश मुळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी गजानन जाधव, सहायक संचालक पल्लवी धारव तसेच माहिती व जनसंपर्क विभागातील इतर अधिकारी उपस्थित होते.

या चॅटबॉटच्या माध्यमातून कोणत्या खात्याचे मंत्री कोण आहेत, त्यांचे संपर्क क्रमांक व मोबाईल क्रमांक, विविध पदे व त्या पदांवरील अधिकारी, राज्यातील जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, जिल्हा पोलीस अधीक्षक यांची नावे व संपर्क तपशील, तसेच राज्यपाल कार्यालय, विधान परिषद आणि विधानसभेचे सदस्य, नागपूर जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालय यांची माहिती तात्काळ उपलब्ध होते. त्यामुळे अधिवेशन काळात माहिती मिळविण्याची प्रक्रिया अधिक सुलभ व कार्यक्षम झाली आहे.

यावेळी बोलताना संचालक डॉ. गणेश मुळे यांनी स्पष्ट केले की, हा ए.आय. चॅटबॉट सध्या प्रायोगिक स्तरावर कार्यरत असून, प्राप्त होणाऱ्या अनुभवाच्या आधारे त्यात पुढील टप्प्यात अधिक सुधारणा करण्यात येणार आहेत. माहिती विभागाच्या डिजिटल परिवर्तनाच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे त्यांनी नमूद केले.

आदित्य जाधव व आदित्य दहरवाल यांनी यापूर्वी केंद्र शासनाच्या CPGRAMS साठी विकसित केलेल्या ए.आय. मॉडेलला तृतीय पुरस्कार मिळालेला असून, त्यांच्या नाविन्यपूर्ण आणि तंत्रज्ञानाधारित कार्याचे हे आणखी एक उल्लेखनीय उदाहरण असल्याचे यावेळी सांगण्यात आले. प्रायोगिक स्तरावरील हा चॅटबॉट https://adhiveshan.adio.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


 Give Feedback



 जाहिराती