सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी : पुण्यात भाजप आणि राष्ट्रवादी विरोधात लढणार, निवडणुका जाहीर होताच मुख्यमंत्र्यांनी शड्डू ठोकला
  • मी नाभिक समाजाची माफी मागतो, बोलण्याच्या ओघात बोलून गेलो; जयंत पाटलांकडून जाहीरपणे दिलगिरी
  • शेतात खेळताना अनर्थ घडला, दबा धरून बसलेल्या बिबट्याची 8 वर्षीय रोहितवर झडप; चिमुकल्याचा दुदैवी अंत
  • मी किती अधिकाऱ्यांना जेलमध्ये टाकतो, याचा रेकॉर्ड करायचाय; नितीन गडकरींचा सनदी अधिकाऱ्यांना इशारा
  • मनपा निवडणुकांची आजच घोषणा, आजपासूनच आचारसंहिता?; हिवाळी अधिवेशन संपताच राज्य निवडणूक आयोगाने बोलावली पत्रकार परिषद
 विश्लेषण

मुंबई-ठाण्यासह 29 महापालिकांच्या निवडणुका जाहीर; 15 जानेवारीला मतदान, 16 जानेवारीला निकाल

डिजिटल पुणे    15-12-2025 16:52:42

मुंबई : राज्यातील प्रलंबित मुंबई-ठाण्यासह 29 महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. या निवडणुकांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार असून 16 जानेवारी 2026 रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे. कार्यक्रम जाहीर होताच आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.

राज्यातील एकूण 3 कोटी 48 लाख मतदार या निवडणुकांत मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मुंबई महापालिकेत एक सदस्यीय वॉर्ड, तर उर्वरित 28 महापालिकांमध्ये एक ते पाच सदस्यीय वॉर्ड पद्धतीने निवडणूक होणार आहे.

ओबीसी आरक्षणामुळे प्रलंबित निवडणुकांना अखेर मुहूर्त

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यामुळे गेल्या 5 ते 7 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या महापालिका निवडणुकांचा मार्ग सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर मोकळा झाला. यापूर्वी 2 डिसेंबर रोजी नगरपालिका व नगरपरिषदांच्या निवडणुका पार पडल्या होत्या. त्यानंतर आता महापालिकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

महापालिका निवडणूक वेळापत्रक

नामनिर्देशन पत्र स्वीकारणे: 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर

अर्जांची छाननी: 31 डिसेंबर

उमेदवारी माघारी: 2 जानेवारी

चिन्ह वाटप व अंतिम उमेदवार यादी: 3 जानेवारी

मतदान: 15 जानेवारी

निकाल: 16 जानेवारी

महत्त्वाची आकडेवारी

एकूण मतदार: 3.48 कोटी

एकूण मतदान केंद्रे: 39,147

मुंबईतील मतदान केंद्रे: 10,111

कंट्रोल युनिट: 11,349

बॅलेट युनिट: 22,000

या निवडणुकांसाठी 1 जुलै 2025 ची मतदार यादी ग्राह्य धरली जाणार आहे. ही यादी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून प्राप्त असल्याने त्यामध्ये नावे वगळण्याचा अधिकार राज्य निवडणूक आयोगाला नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

अर्ज प्रक्रिया व जात वैधता

महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज फक्त ऑफलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत. ज्या उमेदवारांकडे सध्या जात वैधता प्रमाणपत्र नाही, त्यांनी निवडणुकीनंतर सहा महिन्यांच्या आत ते सादर करणे बंधनकारक असेल.

कोणत्या महापालिकांमध्ये होणार निवडणूक? (सदस्य संख्या)

1. बृहन्मुंबई – 227

2. भिवंडी-निजामपूर – 90

3. नागपूर – 151

4. पुणे – 162

5. ठाणे – 131

6. अहमदनगर – 68

7. नाशिक – 122

8. पिंपरी-चिंचवड – 128

9. औरंगाबाद – 113

10. वसई-विरार – 115

11. कल्याण-डोंबिवली – 122

12. नवी मुंबई – 111

13. अकोला – 80

14. अमरावती – 87

15. लातूर – 70

16. नांदेड-वाघाळा – 81

17. मीरा-भाईंदर – 96

18. उल्हासनगर – 78

19. चंद्रपूर – 66

20. धुळे – 74

21. जळगाव – 75

22. मालेगाव – 84

23. कोल्हापूर – 92

24. सांगली-मिरज-कुपवाड – 78

25. सोलापूर – 113

26. इचलकरंजी – 76

27. जालना – 6

28. पनवेल – 78

29. परभणी – 65

एकूणच, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कारभाराला दिशा देणाऱ्या या निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


 Give Feedback



 जाहिराती