सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • ऑनलाईन पत्ते खेळून झाले, शासनाला चुना लावून शिक्षाही झाली, आता तरी कोकाटेंचा राजीनामा घेणार का? रोहित पवारांचा सवाल
  • मोठी बातमी : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 52 जागांचा प्रस्ताव, भाजपकडून आकडेवारी मांडत पहिली ऑफर
  • महानगरपालिका निवडणुकीची घोषणा होताच पिंपरी-चिंचवडमध्ये चक्रं फिरली, दोन्ही राष्ट्रवादींची बैठक, भाजपला रोखण्यासाठी काका-पुतण्या एकत्र
  • पिंपरीत भाजप विरोधात सर्वपक्षीय एकवटणार, मनसे-काँग्रेस एकत्र, अजित पवारांनाही निमंत्रण धाडलं
  • अखेर ठरलं! नांदणी मठाची माधुरी हत्तीण परत येणार; आरोग्यासंदर्भातील समाधानकारक अहवाल सादर, वनताराचे संवर्धन केंद्र बांधण्यासही परवानगी
  • समृद्धी महामार्गावर कारचा टायर फुटला, कल्याणमधील कुटुंबावर काळाचा घाला
  • ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा कधी होणार? संजय राऊतांनी मुहूर्त सांगितला, आजच राज ठाकरेंची भेट घेणार
 शहर

आजचे लाभार्थी कंत्राटदार हे भाजपचे देणगीदार आहेत की सरकारच कंत्राटदारांचे आहे? : आप चा थेट प्रहार

डिजिटल पुणे    16-12-2025 18:52:01

 पिंपरी चिंचवड : काल दुपारी निवडणुका जाहीर होऊन आचारसंहिता लागू होण्याच्या काही तास आधी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये आयुक्त हर्डीकर यांनी जवळपास अडीचशे कोटीच्या निविदा मंजूर केल्या आहेत. त्यातील 154 कोटीची निविदा ही सुरक्षा विभागातील रखवालदार पुरवण्याची आहे. याशिवाय इतरही अनेक निविदा आहेत. आता हा विषय तातडीचा होता का? लोकप्रतिनिधी नसताना अशा पद्धतीने एवढ्या मोठ्या संख्येने रखवालदार नियुक्ती ही योग्य आहे का? आज मंजूर झालेल्या कामांची जाहिरात जर निवडणुकीदरम्यान युती सरकारमधील पक्षांचे उमेदवार करणार असतील तर हा आचारसंहिता भंग ठरणार नाही का, हे निवडणूक आयोगाने सांगायला हवे. पुण्यातही तीन दिवसांपूर्वी चारशे कोटीहून अधिक रुपयाच्या निविदा व विकास कामांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आलेले आहेत. आयुक्त हेही युती सरकारच्या प्रचार मोहिमेचे प्यादे आहेत का? हे सरकार कंत्राटदारांचे आहे का? असा सवाल आम आदमी पार्टीचे मुकुंद किर्दत यांनी केला आहे.


 Give Feedback



 जाहिराती