सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • धनंजय मुंडे मंत्रिमंडळात कमबॅक करण्याची शक्यता, कोकाटे आऊट झाल्यास धनूभाऊंची एन्ट्री होणार?
  • : माणिकराव कोकाटेंचं अटक वॉरंट निघाल्याने देवेंद्र फडणवीस नाराज, अजित पवारांशी तातडीची चर्चा
  • मोठी बातमी : अजित पवार मुंबईत महायुतीतून बाहेर पडणार, आजच मोठा निर्णय घेणार?
  • बंडखोरी रोखण्यासाठी राज–उद्धव ठाकरे यांची ‘लास्ट मिनिट’ स्ट्रॅटेजी; उमेदवारांची नावं शेवटपर्यंत गुलदस्त्यात
  • माणिकराव कोकाटेंचं खातं कोणाला द्यायचं सांगा...; देवेंद्र फडणवीसांचा अजित पवारांना थेट प्रश्न,
  • 'उद्धव साहेबांविषयीचा माझ्या मनातील रिस्पेक्ट कायम राहील', पण... तेजस्वी घोसाळकरांनंतर आणखी एका शिवसैनिकाने ठाकरेंची साथ सोडली
  • मोठी बातमी: क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंना झटका, कोणत्याही क्षणी अटक वॉरंट निघण्याची शक्यता
  • माणिकराव कोकाटेंच मंत्रिपद दुसऱ्यांदा धोक्यात, अजित पवारांच्या भेटीत महत्त्वाच्या निर्णयाची शक्यता
 DIGITAL PUNE NEWS

प्राचार्य डॉ. प्रदीप जाधव यांना ‘हायर एज्युकेशन लीडर ऑफ द इयर - २०२५’ पुरस्कार

डिजिटल पुणे    17-12-2025 16:25:05

पुणे : भारती विद्यापीठाचे अभियांत्रिकी महिला महाविद्यालय, पुणे येथील प्राचार्य डॉ. प्रदीप जाधव यांना सिंप्लीलर्न युनिव्हर्सिटी लीडर्स फोरममध्ये ‘हायर एज्युकेशन लीडर ऑफ द इयर - २०२५’ या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा कार्यक्रम फेअरफिल्ड बाय मॅरियट, खराडी, पुणे येथे पार पडला.हा पुरस्कार सिंप्लीलर्न व प्लस नाईन वन मीडिया यांच्या संयुक्त विद्यमाने प्रदान करण्यात आला. सिंप्लीलर्नचे आशिया-पॅसिफिक  वाणिज्य विभागाचे उपाध्यक्ष श्री. गवेश मुंथा यांनी डॉ. प्रदीप जाधव यांना  पुरस्कार प्रदान केला.

 

सिंप्लीलर्नकडून देण्यात आलेल्या अधिकृत प्रमाणपत्रामध्ये उच्च शिक्षण क्षेत्रातील दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व, शैक्षणिक प्रशासन बळकट करणे, संशोधन संस्कृतीचा विकास तसेच विद्यार्थी-केंद्रित व तंत्रज्ञानाधारित शिक्षणासाठी डॉ. प्रदीप जाधव यांनी दिलेल्या योगदानाची विशेष दखल घेण्यात आली आहे. या प्रमाणपत्रावर सिंप्लीलर्नचे वरिष्ठ उपाध्यक्ष श्री. प्रशांत गंगवाल यांची स्वाक्षरी आहे.या कार्यक्रमास देशभरातील कुलगुरू, प्राचार्य, संचालक व वरिष्ठ शैक्षणिक प्रशासक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भविष्योन्मुख नेतृत्व, डिजिटल परिवर्तन व उच्च शिक्षणातील नव्या दिशा यावर यावेळी विचारमंथन झाले.

 

 

या आंतरराष्ट्रीय यशाबद्दल भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालायचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, भारती विद्यापीठाचे कार्यवाह डॉ. विश्वजीत कदम तसेच भारती विद्यापीठ आरोग्य विज्ञान विभागाच्या कार्यकारी संचालिका डॉ. अस्मिता जगताप यांनी डॉ. प्रदीप जाधव यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

 


 Give Feedback



 जाहिराती