सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • अजित पवारांनी माणिकराव कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा पाठवला
  • माणिकराव कोकाटेंना रुग्णालयातूनच अटक करणार? नाशिकच्या पोलीस आयुक्तांनी माहिती मागवली, घडामोडींना वेग
  • भयानक हत्याकांडांने देश हादरला, मुलाने आई-वडिलांनी वरंवट्याने ठेचून मारले, करवतीने मृतदेहांचे तुकडे करुन नदीत फेकले
  • पुण्यात शिंदे गटात दुफळी, धंगेकर 165 जागांवर ठाम तर भानगिरे भाजपकडे फक्त 35-40 जागा मागण्याच्या तयारीत, एकनाथ शिंदे कोणाचं ऐकणार?
  • जिथे शिवसेना जिंकली, ती जागाही आम्हालाच हवी, भाजपने बंडखोर आणि नंबर दोनचे गणित मांडलं, नव्या पॅटर्नने शिंदेसेना बुचकळ्यात
  • भाजपमध्ये प्रवेश करताच प्रज्ञा सातवांकडून देवाभाऊंचं कौतुक, काँग्रेस सोडण्याबाबत चकार शब्दही नाही
 व्यक्ती विशेष

माणिकराव कोकाटेंना रुग्णालयातूनच अटक होणार? नाशिक पोलिसांकडून वैद्यकीय अहवालांची पडताळणी

डिजिटल पुणे    18-12-2025 17:17:27

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे सध्या मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार घेत आहेत. 1995 साली शासकीय सदनिका मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रे सादर करून सरकारची फसवणूक केल्याच्या प्रकरणात त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी झाल्याने त्यांना रुग्णालयातूनच अटक होणार का, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

नाशिक जिल्हा न्यायालयाने कोकाटेंना ठोठावलेली दोन वर्षांची कारावासाची शिक्षा कायम ठेवल्यानंतर प्रथम वर्ग न्यायालयाने अटक वॉरंट काढले आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी प्रकरणाची सविस्तर माहिती मागवली असून, कोकाटेंची सध्याची वैद्यकीय स्थिती, डॉक्टरांचा अहवाल आणि कायदेशीर बाबींची पडताळणी सुरू आहे. या तपासणीनंतर पुढील कारवाईबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

दरम्यान, या प्रकरणात माणिकराव कोकाटेंचे बंधू विजय कोकाटे यांच्याविरोधातही अटक वॉरंट जारी करण्यात आले असून, त्यांचा शोध घेण्यासाठी नाशिक पोलिसांनी हालचाली तीव्र केल्या आहेत. विजय कोकाटे सध्या कुठे आहेत, याबाबत ठोस माहिती उपलब्ध नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.कायदेशीर प्रक्रियेच्या अंतिम टप्प्यानंतर माणिकराव कोकाटेंना रुग्णालयातूनच अटक होणार का, तसेच विजय कोकाटे पोलिसांच्या हाती लागतात का, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.


 Give Feedback



 जाहिराती