सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • अजित पवारांनी माणिकराव कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा पाठवला
  • माणिकराव कोकाटेंना रुग्णालयातूनच अटक करणार? नाशिकच्या पोलीस आयुक्तांनी माहिती मागवली, घडामोडींना वेग
  • भयानक हत्याकांडांने देश हादरला, मुलाने आई-वडिलांनी वरंवट्याने ठेचून मारले, करवतीने मृतदेहांचे तुकडे करुन नदीत फेकले
  • पुण्यात शिंदे गटात दुफळी, धंगेकर 165 जागांवर ठाम तर भानगिरे भाजपकडे फक्त 35-40 जागा मागण्याच्या तयारीत, एकनाथ शिंदे कोणाचं ऐकणार?
  • जिथे शिवसेना जिंकली, ती जागाही आम्हालाच हवी, भाजपने बंडखोर आणि नंबर दोनचे गणित मांडलं, नव्या पॅटर्नने शिंदेसेना बुचकळ्यात
  • भाजपमध्ये प्रवेश करताच प्रज्ञा सातवांकडून देवाभाऊंचं कौतुक, काँग्रेस सोडण्याबाबत चकार शब्दही नाही
 व्यक्ती विशेष

मोठी बातमी : माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा स्वीकारला; अजित पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे पाठवला

डिजिटल पुणे    18-12-2025 17:48:05

मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा स्वीकारल्याची अधिकृत घोषणा केली आहे. कोकाटे यांचा राजीनामा स्वीकारावा, असे पत्र अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवले आहे. याबाबतची माहिती अजित पवार यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली.अजित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, माननीय न्यायालयाच्या निकालानंतर महाराष्ट्र मंत्रिमंडळातील सदस्य व पक्षातील सहकारी माणिकराव कोकाटे यांनी आपला राजीनामा माझ्याकडे सुपूर्द केला आहे. कायदे व नियम सर्वोच्च असून ते कोणत्याही व्यक्तीपेक्षा वरचढ आहेत, या पक्षाच्या दीर्घकालीन भूमिकेनुसार हा राजीनामा तत्त्वतः स्वीकारण्यात आला आहे.

बनावट कागदपत्रांच्या आधारे मुख्यमंत्री स्वेच्छाधिकार कोट्यातून सदनिका मिळवल्याप्रकरणी अल्पसंख्याक विकास व क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने सुनावलेली दोन वर्षांची कारावासाची शिक्षा सत्र न्यायालयाने कायम ठेवली. त्यानंतर बुधवारी त्यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले होते.

वॉरंट जारी होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकाटे यांच्याकडील सर्व खाती काढून घेतली होती. त्यामुळे ते बिनखात्याचे मंत्री बनले होते. यानंतर कोकाटे यांनी आपला राजीनामा पक्षाचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द केला.

संवैधानिक प्रक्रियेनुसार पुढील कार्यवाहीसाठी कोकाटे यांचा राजीनामा मुख्यमंत्री महोदयांकडे पाठवण्यात आला असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले. सार्वजनिक जीवन हे संविधानिक नैतिकता, संस्थात्मक प्रामाणिकता आणि न्यायपालिकेच्या सन्मानावर आधारित असावे, या मूल्यांवर आमचा पक्ष ठाम आहे. कायदेशीर प्रक्रियेवर आमचा पूर्ण विश्वास असून राज्यात कायदा व सुव्यवस्थेचे काटेकोर पालन केले जाईल, असेही अजित पवार यांनी नमूद केले.लोकशाही मूल्ये जपली जातील आणि जनतेच्या विश्वासाला तडा जाणार नाही, या दृष्टीकोनातून आम्ही सदैव कार्यरत राहू, असे त्यांनी म्हटले आहे.


 Give Feedback



 जाहिराती