सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • अजित पवारांनी माणिकराव कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा पाठवला
  • माणिकराव कोकाटेंना रुग्णालयातूनच अटक करणार? नाशिकच्या पोलीस आयुक्तांनी माहिती मागवली, घडामोडींना वेग
  • भयानक हत्याकांडांने देश हादरला, मुलाने आई-वडिलांनी वरंवट्याने ठेचून मारले, करवतीने मृतदेहांचे तुकडे करुन नदीत फेकले
  • पुण्यात शिंदे गटात दुफळी, धंगेकर 165 जागांवर ठाम तर भानगिरे भाजपकडे फक्त 35-40 जागा मागण्याच्या तयारीत, एकनाथ शिंदे कोणाचं ऐकणार?
  • जिथे शिवसेना जिंकली, ती जागाही आम्हालाच हवी, भाजपने बंडखोर आणि नंबर दोनचे गणित मांडलं, नव्या पॅटर्नने शिंदेसेना बुचकळ्यात
  • भाजपमध्ये प्रवेश करताच प्रज्ञा सातवांकडून देवाभाऊंचं कौतुक, काँग्रेस सोडण्याबाबत चकार शब्दही नाही
 व्यक्ती विशेष

पुण्यात भाजप–शिवसेना जागावाटपाची पहिली बैठक, रवींद्र धंगेकर डावलले भाजप नेत्यांवरील टीका भोवली; शिवसेनेकडून नीलम गोऱ्हे, विजय शिवतारे चर्चेला उपस्थित

डिजिटल पुणे    18-12-2025 18:03:40

पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेची पहिली अधिकृत बैठक आज पार पडली. मात्र या महत्त्वाच्या बैठकीत शिवसेनेचे पुणे शहर महानगरप्रमुख रवींद्र धंगेकर यांना डावलण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.ही बैठक पुण्यातील रामी ग्रँड हॉटेल येथे पार पडली. बैठकीला भाजपकडून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार माधुरी मिसाळ, भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे उपस्थित होते.

शिवसेनेकडून कोण उपस्थित?

शिवसेनेकडून या जागावाटपाच्या चर्चेला

नीलम गोऱ्हे, विजय शिवतारे आणि नाना भानगिरे हे प्रमुख नेते उपस्थित होते. विशेष म्हणजे, पुणे शहर महानगरप्रमुख असतानाही रवींद्र धंगेकर यांना या बैठकीचे आमंत्रण देण्यात आले नाही.

टीका भोवली?

काही दिवसांपूर्वी जैन बोर्डिंग प्रकरणात रवींद्र धंगेकर यांनी भाजपचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर उघडपणे टीका केली होती. त्याच पार्श्वभूमीवर आजच्या बैठकीतून धंगेकरांना डावलण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

शिवसेनेकडूनच डावलणूक?

भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी सांगितले की, भाजपने आपल्या स्थानिक नेत्यांना तर शिवसेनेने आपल्या स्थानिक नेत्यांना बैठकीचे निमंत्रण दिले होते. मात्र धंगेकरांना शिवसेनेकडूनच आमंत्रण देण्यात आले नसल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे ही डावलणूक भाजपकडून नसून शिवसेनेकडूनच झाली का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

जागावाटपावर मतभेद?

महायुतीत शिवसेना 35 ते 40 जागांचा प्रस्ताव भाजपकडे मांडणार असल्याची चर्चा आहे. मात्र रवींद्र धंगेकर हे पुणे महापालिकेच्या 165 जागा शिवसेनेने लढवाव्यात, या भूमिकेवर ठाम असल्याचं बोललं जात आहे. याच भूमिकेमुळे पक्षांतर्गत नाराजी वाढल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

धंगेकरांचा राजकीय प्रवास

रवींद्र धंगेकर यांनी कसबा विधानसभा पोटनिवडणूक काँग्रेसच्या चिन्हावर जिंकली होती. मात्र 2024 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा भाजपचे हेमंत रासने यांच्याकडून पराभव झाला. त्यानंतर त्यांनी काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश केला. प्रवेशानंतर काही काळ शांत असलेले धंगेकर पुन्हा एकदा भाजपवर टीका करत आक्रमक झाल्याचं चित्र आहे.महापालिका निवडणुकीच्या तोंडावर महायुतीतील ही अंतर्गत धुसफूस पुढील राजकीय समीकरणांवर परिणाम करणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.


 Give Feedback



 जाहिराती