सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मनसे-ठाकरे गटाचे जागावाटप अंतिम टप्प्यात, मातोश्रीवरच्या बैठकीत शिवडीचा तिढा सुटला; विक्रोळी, भांडूप, दादरमधील वॉर्डांबाबत चर्चा सुरु
  • मोठी बातमी : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेत, दादा-ताईंचं बोलणं झालंय, सगळेजण घड्याळावर लढणार, अजितदादांच्या बड्या नेत्याचा मोठा दावा
  • मोठी बातमी : माणिकराव कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेलाही स्थगिती, सुप्रीम कोर्टाकडून सर्वोच्च न्याय!
  • मुंबईत मनसे-ठाकरे गटाचं जागावाटप अडलं, 'या' 4 ठिकाणी रस्सीखेच; राज ठाकरेंनी संजय राऊत-परबांना संदेश धाडला
  • भाजप आमदार पराश शाहांनी कानाखाली मारलेला रिक्षावाला मराठी, संजय राऊतांचा दावा, भाजपवर आगपाखड
 जिल्हा

कुणाल पाटील युवा सामाजिक संस्था पागोटे आयोजित भव्य सोलो नृत्य स्पर्धा २०२५ दणक्यात संपन्न.

विठ्ठल ममताबादे (प्रतिनिधी )    22-12-2025 16:34:13

उरण : रा.जि.प. शाळा पागोटे तालुका उरण या ठिकाणी कुणाल पाटील युवा सामाजिक संस्था पागोटे यांच्या तर्फे भव्य दिव्य अशी राज्य स्तरीय सोलो नृत्य स्पर्धा संपन्न झाली.शिवसेनेचे माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला मानवंदना करून हुतात्म्यांच्या पुतळ्यांना अभिवादन करून कार्यक्रमाला सुंदर सुरुवात झाली. युवा पागोटे सरपंच कुणाल पाटील,शिवसेना शाखाप्रमुख महेंद्र पाटील, सतीश पाटील, मयूर पाटील , प्रणित पाटील, नितीन पाटील ,करिष्मा पाटील (उपसरपंच ) सरपंच कुणाल पाटील यांच्या सुविद्य पत्नी प्रेरणा कुणाल पाटील, अरुण पाटील,  चाणजे सरपंच अजय म्हात्रे, कुणाल पाटील युवा सामाजिक संस्थेचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांची उपस्थिती कार्यक्रमासाठी लाभली.

महाराष्ट्रातून विविध ठिकाणाहून संभाजी नगर, नाशिक, वेंगुर्ले, अलिबाग,पेण माणगाव,उरण , बदलापूर इत्यादी ठिकाणांहून आपला नृत्याविष्कार सादर करण्यासाठी स्पर्धक सहभागी झाले होते.माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांनी आपल्या मनोगतातून कुणाल पाटील यांच्या सामाजिक कार्यातील असलेल्या योगदानाबद्दल गौरवोद्गार काढले.तसेच त्यांना प्रत्येक कार्यात आपला सपोर्ट राहील असे अश्वस्त करून त्यांना शुभेच्छा दिल्या. एकापेक्षा एक नृत्याविष्कार सादर झाले.रोमांचक, दिलखेच,भावनेला स्पर्श करणारे नृत्याविष्कार स्पर्धकांनी सादर केले. महिलांची आवडीची मानाची पैठणीचा लकी ड्रॉ काढण्यात आला त्यातून १० पैठण्या पागोटे व पागोटे बाहेरील महिला विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते देण्यात आल्या.

टिव्ही शो ला सादरीकरण केलेल्या नृत्य कलाकारांनी या स्पर्धेत आपली कला सादर करुन प्रेक्षकांना खिळवून ठेवले.  या सोलो नृत्य स्पर्धेचे परीक्षण सोनू सर व अमृत सर यांनी केले.या स्पर्धेतील विजेते पहिल्या गटातून इशिता बरवड पुणे, हर्ष पवार मुंबई, दुसऱ्या गटात घनश्याम सोनवले बदलापूर आणि तिसऱ्या गटात आर्या नारंगीकर उरण, दुर्वा झावरे अलिबाग ,दृष्टी ठाकूर या स्पर्धकांनी बाजी मारली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आपल्या खड्या आवाजात आणि सुंदर भाषा शैलीत अतिश पाटील यांनी केले.कुणाल पाटील या युवा सरपंचाने सामाजिक कामातून त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे. पागोटे गावात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अनेक आरोग्य शिबिरे व अनेक उपक्रम यशस्वीरीत्या राबवले आहेत .त्यामुळे नेहमीच अशा कार्यक्रमांमधून युवा पिढीला आपल्या कलेचा अविष्कार सादर करण्यासाठी एक प्रकारचा व्यासपीठ कुणाल पाटील या युवकाकडून मिळत आहे. याबद्दल कुणाल पाटील यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.


 Give Feedback



 जाहिराती