पुणे : भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत तसेच भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद,उपप्रादेशिक कार्यालय पुणे (विदेश मंत्रालय,भारत सरकार ) यांच्या सहकार्याने गुरुवार,दि. २५ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता समूह कथक नृत्य सादरीकरणाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात कथक नृत्यशैलीतील दोन विशेष सादरीकरणे रसिकांसमोर सादर होणार आहेत. कथक नृत्यांगना मंजिरी कारुळकर आणि त्यांच्या शिष्यांचे ‘कृष्ण आख्यान’ हे सादरीकरण श्रीकृष्णाच्या जीवनातील विविध प्रसंग कथक नृत्याच्या माध्यमातून उलगडणार आहे. तसेच आसावरी पाटणकर आणि त्यांच्या शिष्यांचे ‘अर्पण गुरु को समर्पण’ हे गुरुपरंपरेला समर्पित नृत्य सादरीकरण कार्यक्रमाचे आणखी एक आकर्षण ठरणार आहे.हा सांस्कृतिक कार्यक्रम भारतीय विद्या भवनच्या सरदार महादेव बळवंत नातू सभागृह(सेनापती बापट रस्ता) येथे आयोजित करण्यात आला आहे.
सर्व रसिक प्रेक्षकांना या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून प्रवेश विनामूल्य आहे. भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजित हा २७० वा कार्यक्रम आहे,अशी माहिती भारतीय विद्या भवनचे मानद सचिव नंदकुमार काकिर्डे यांनी दिली.