सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी! ठाकरे बंधूंच्या युतीची उद्या दुपारी 12 वाजता घोषणा; मुंबईचं जागावाटपही निश्चित, मनपासाठी ठाकरे सज्ज
  • धक्कादायक! ईव्हीएम मशिनवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं नाव झाकलं, 7 कर्मचारी निलंबित, प्रांतलाही नोटीस
  • थंडीचा कडाका वाढला; पुढील दोन दिवसात किमान तापमानात मोठी घट, हवामान खात्याचा इशारा
  • अजित पवारांचा पक्ष आंदेकर कुटुंबातील दोघांना उमेदवारी देण्याच्या तयारीत, राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांचे मोठे संकेत
  • ‘कोल्हापूर कस्सं? तुम्ही म्हणशीला तसं!’ – काँग्रेसची नवी टॅगलाईन, सतेज पाटलांनी मनपासाठीचा प्लॅन मांडला
  • दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर मी पक्षाचा राजीनामा देईन; प्रशांत जगतापांचा इशारा
  • अजित पवार चक्क महाविकास आघाडीसोबत जाण्याची शक्यता; पुण्यातील राजकीय घडामोडींकडे महाराष्ट्राचं लक्ष
 व्यक्ती विशेष

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे मोठे यश ५ नगराध्यक्ष, १०४ नगरसेवक.

डिजिटल पुणे    23-12-2025 17:14:16

मुंबई : राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांच्या निकालात प्रस्थापित जातदांडगे धनदांडगे यांच्या उमेदवारावर मात करून वंचित बहुजन आघाडीने प्रेरणादायी लक्षवेधी यश मिळवले आहे. या निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीने ५ नगराध्यक्ष पदांवर विजय मिळवला असून, १०४ नगरसेवक निवडून आणत राज्याच्या स्थानिक राजकारणात आपली ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. राजकारणातील प्रस्थापित राजकीय पक्षांना जोरदार धक्का देत वंचितने अनेक ठिकाणी निर्णायक भूमिका बजावली आहे.

  ग्रामीण व निमशहरी भागात विशेषतः असंघटित कष्टकरी दलित,आदिवासी, अल्पसंख्याक,मागासवर्गीय व कामगारवर्गातील मतदारांनी वंचित बहुजन आघाडीवर विश्वास टाकल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे.अनेक ठिकाणी थेट सत्ताधाऱ्यां विरोधात लढत देत वंचितने नगराध्यक्ष पदावर शिक्का मारून झेंडा फडकावला आहे.तर काही नगरपरिषदांमध्ये बहुमताच्या जवळ पोहोचत सत्तास्थापनेत "किंगमेकर" ची भूमिका वंचितकडे आली आहे.

 वंचित बहुजन आघाडीने निवडणूक प्रचारात स्थानिक समस्यावर विशेषभर दिला होता.पाणीपुरवठा,स्वच्छता,आरोग्य सुविधा,शिक्षण,बेरोजगारी,महागाई,घरकुल योजना,नागरी मूलभूत सुविधा यासारख्या मुद्द्यांवर आधारित प्रचाराचा थेट फायदा पक्षाला मिळाल्याचे स्थानिक कार्यकर्ता,नेत्यांचे मत आहे. “सामान्यांचा आवाज नगरपरिषदेत पोहोचवायचा” हा संदेश मतदारांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचे काम खऱ्या अर्थाने कार्यकर्त्याने प्रामाणिकपणे केले. त्यामुळेच वंचितला अपेक्षित यश मिळाले.या यशावर प्रतिक्रिया देताना वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी सांगितले की,हा विजय म्हणजे बहुजन समाजाच्या राजकीय जागृतीचा परिणाम आहे.प्रस्थापित पक्षांच्या अपयशी धोरणांना मतदारांनी नकार दिला असून,नव्या आणि पर्यायी राजकारणाला संधी दिली आहे.निवडून आलेले नगराध्यक्ष आणि नगरसेवक हे पारदर्शक,जनहित जपणारे सामाजिक बांधिलकी ठेऊन आणि भ्रष्टाचारमुक्त कारभार देण्यास प्राधान्य देतील,असा विश्वासही यावेळी कार्यकर्ता कडून व्यक्त करण्यात आला आहे.

अ‍ॅड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या कष्ट,त्याग आणि जिद्धेने सर्व बहुजन समाजातील वंचित घटकात राजकीय स्वप्न सत्यात साकारतांना दिसत आहेत.त्यात सुजात दादा आंबेडकर यांनी पायाला भिंगरी बंधून जो झंझावात दौरा केला.आणि सभा गाजविल्या त्यामुळे तरुणात एकजोश निर्माण झाला.त्याचा निकल हा प्रेरणादायी व लक्षवेधी ठरला आहे.वंचित बहुजन आघाडीच्या या यशामुळे राज्याच्या आगामी राजकारणात नव्या समीकरणांना सुरुवात होण्याची शक्यता आहे. स्थानिक पातळीवर मजबूत संघटन उभे राहत असल्याने आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडी अधिक ताकदीने मैदानात उतरण्याची चिन्हे दिसत आहेत.दैनिक वृतपत्राचे पत्रकार संपादक आणि चॅनल मिडियचे पत्रकार संपादक मनुवादी मानसिकता डोळ्यासमोर ठेऊन पत्रकारिता करतात.

ही अनेक वृतपत्रातील वृतवाहिन्यावरील नगराध्यक्ष आणि नगरसेवक यांचे आकडे कुठे ही सत्यता दाखवतांना दिसत नाही.वृतवाहिन्यातील पत्रकार संपादक किती मनुवादी आहेत हे त्यांच्या स्क्रीनवर दाखवून देतांना स्पष्टपणे दिसते.स्वयंघोषित मराठी हृदय सम्राट राज ठाकरेच्या (महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला) मनसे एकही जागा मिळाली नाही तरी त्या नांवाची दाखल घेऊन शून्य शून्य दाखवले जाते पण राज्यातील प्रत्येक नगरपरिषद व नगरपंचायत उमेदवार देऊन निवडणूक लढणाऱ्या व विजयी घौडदौड करणाऱ्या वंचित बहुजन आघडीची दाखल घेतली जात नाही. ही कोणती पत्रकारिता आहे?.राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायत मध्ये एकूणच ५ नगराध्यक्ष आणि १०४ नगरसेवकांच्या विजयाने वंचित बहुजन आघाडीने आपली स्वतंत्र राजकीय ओळख अधिक ठळकपणे अधोरेखित केली आहे.वंचित बहुजन आघाडीच्या दुसऱ्या नंबर वरच्या उमेदवाराची मतदार संख्या दाखवली तर शेवटी कोणी बाजी मारली ते पाहून सर्वांची झोप उडल्या शिवाय राहणार नाही.वंचित चे काही किर्याशील पदाधिकारी कार्यकर्ते शेवटच्या क्षणी अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहिले आणि ते ही निवडून आले.त्याची दखल घेतल्या गेली नाही.त्यामुळे अधिकृत नगराध्यक्ष व नगरसेवक किती ही माहिती वंचित बहुजन आघाडी प्रवक्ता जाहीर करू शकतो.


 Give Feedback



 जाहिराती