नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आजपासून (25 डिसेंबर) अधिकृतपणे प्रवासी सेवेसाठी सुरू करण्यात आले आहे. पहिल्याच दिवशी विमानतळावरून देशांतर्गत 30 विमानांची ये-जा होणार असून सुमारे 4 हजार प्रवासी या सुविधेचा लाभ घेणार आहेत. पुढील 15 दिवसांत विमानसेवा वाढवून दररोज 48 विमानांची हालचाल होणार आहे.
सद्या देशपातळीवरील विमान सेवा सुरू होणार असून मार्च महिन्यात आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होईल. पहिल्या टप्प्यात सुरू होत असलेल्या विमानतळावरून वर्षाला 2 कोटी पर्यंत प्रवासी विमानसेवेचा लाभ घेणार आहेत. नवी मुंबई विमानतळावर सद्या दोन धावपट्ट्या अस्तित्वात आहेत. पुढील काळात तिसरी धावपट्टी उभारली जाणार आहे. यानतंर जगातील सर्वात जास्त प्रवासांची वर्दळ असलेले विमानतळ म्हणून नवी मुंबई विमानतळाला मान मिळणार आहे. इंडिगो, एअर इंडिया एक्सप्रेस, आकासा एअर व स्टार एअर या विमानकंपण्या सेवा देणार आहेत.
दोन धावपट्ट्यांसह भव्य सुरुवात; तिसरी धावपट्टी लवकरच
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सध्या दोन अत्याधुनिक धावपट्ट्या (Runways) कार्यान्वित आहेत. भविष्यात तिसरी धावपट्टी उभारली जाणार असून, त्यामुळे हे विमानतळ जगातील सर्वाधिक वर्दळीच्या विमानतळांपैकी एक ठरणार आहे.
इंडिगो, एअर इंडिया एक्सप्रेस, आकासा एअर आणि स्टार एअर या प्रमुख विमान कंपन्या सध्या सेवा देत आहेत.
नवी मुंबई विमानतळाची हायटेक वैशिष्ट्यं
विमानतळ उभारणीसाठी १ लाख कोटी रुपयांहून अधिक खर्च
एकूण ११६० हेक्टर क्षेत्रफळावर विमानतळाची उभारणी
लंडनच्या हिथ्रो विमानतळाशी तुलना
पॅसेंजर आणि कार्गो दोन्ही सुविधा उपलब्ध
३५० एअरक्राफ्ट पार्किंग स्लॉट्स
पर्यावरणपूरक डिझाइन – हरित ऊर्जा व जलसंधारणावर भर
टर्मिनलमध्ये डिजिटल आर्टद्वारे भारतीय संस्कृतीचे दर्शन
ऑपरेशन्ससाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर
नवी मुंबई विमानतळामुळे मुंबई विमानतळावरील 70% लोड कमी होणार
मुंबई मेट्रोपॉलिटनसाठी गेमचेंजर प्रकल्प
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा केवळ विमानसेवेपुरता मर्यादित नसून, तो मुंबई महानगर प्रदेशाच्या (MMR) आर्थिक, तांत्रिक आणि लॉजिस्टिक विकासाला गती देणारा गेमचेंजर प्रकल्प ठरणार आहे.