सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • एकनाथ शिदेंना ठाण्यात मोठा धक्का! मिनाक्षी शिंदे यांचा शिवसेनेचा राजीनामा
  • लाखोंच्या जनआक्रोशासमोर केंद्र सरकारचं लोटांगण; अरवली पर्वतरांगांमध्ये नवीन खाणपट्ट्यांवर संपूर्ण बंदी
  • मोठी बातमी : जितेंद्र आव्हाड आमचे दुश्मन नाहीत, नजीब मुल्लांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या, ठाण्यातही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चिन्हं!
  • हायकोर्ट अ‍ॅक्शन मोडवर, नायलॉन मांजावर संक्रांत; पालकांना 50 हजार, दुकानदारास अडीच लाखांच्या दंडाचा प्रस्ताव
  • विचारसरणीच्या मुद्द्यावर पवारांची 26 वर्षांची साथ सोडली प्रशांत जगतापांची काँग्रेसमध्ये नवी इनिंग; घाऊक पक्षांतरांच्या काळात ठळक ठरणारा निर्णय
 व्यक्ती विशेष

मोठी बातमी : पुण्यात भाजपची 100 उमेदवारांची पहिली यादी तयार; इच्छुकांमध्ये धाकधूक

डिजिटल पुणे    25-12-2025 15:08:42

पुणे : आगामी पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या हालचालींना वेग आला आहे. पुण्यातील १६५ जागांपैकी तब्बल १०० उमेदवारांची पहिली यादी भाजपने तयार केली असून ही यादी उद्या, शुक्रवार (२६ डिसेंबर) रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे. उर्वरित ४० ते ५० जागांवरील उमेदवारांबाबत अद्याप एकमत न झाल्याने अंतिम निर्णय प्रदेश पातळीवरील नेत्यांकडून घेतला जाणार आहे.

100 नावांवर एकमत, 50 जागांवर पेच

भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत १०० पेक्षा अधिक नावांवर एकमत झाले आहे. मात्र काही प्रभागांमध्ये इच्छुकांची संख्या जास्त असल्याने ४० ते ५० जागांवर निर्णय प्रलंबित ठेवण्यात आला आहे. ही नावे आज प्रदेश कार्यालयाकडे पाठवली जाणार असून, अंतिम यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे सुपूर्त होण्याची शक्यता आहे.

नेत्यांच्या नातेवाईकांनाही उमेदवारीची अपेक्षा

पुण्यात भाजपमधील अनेक नेते आणि आमदारांचे नातेवाईक विविध प्रभागांतून इच्छुक आहेत.केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कुटुंबाकडून दुष्यंत मोहोळ,मंत्री माधुरी मिसाळ यांच्या कुटुंबाकडून करण मिसाळ,दिवंगत आमदार गिरीश बापट यांच्या सून स्वरदा बापट यांची नावे चर्चेत आहेत.यामुळे पक्षांतर्गत चुरस वाढली असून अनेक इच्छुकांमध्ये धाकधूक निर्माण झाली आहे.

भाजप-शिवसेना (शिंदे) युतीत अजूनही तिढा

पुण्यात भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) युतीने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असला, तरी जागावाटपाचा फॉर्म्युला अजून निश्चित झालेला नाही.शिवसेना (शिंदे) गटाने शहरातील ३४ जागांची मागणी केली होती. मात्र एवढ्या जागा देणे शक्य नसल्याचे भाजपने स्पष्ट केल्याने युतीतील तणाव कायम आहे.

भाजपची एकहाती सत्तेची रणनीती

४१ प्रभागांमध्ये एकूण १६५ जागा असून भाजप १२५ जागांवर विजयाचा दावा करत आहे. त्यामुळे भाजप एकहाती सत्ता कशी मिळवता येईल, यासाठीही चाचपणी करत असल्याची चर्चा आहे.

कोअर कमिटी बैठक

उमेदवार निवडीसाठी बुधवारी एका हॉटेलमध्ये भाजपची महत्त्वाची कोअर कमिटी बैठक पार पडली. या बैठकीला

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील, शहराध्यक्ष धीरज घाटे, निवडणूक प्रमुख गणेश बीडकर, राजेश पांडे, माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले उपस्थित होते.

विरोधकांचीही रणनिती आक्रमक

मनसे आणि ठाकरे गट एकत्र निवडणूक लढवण्याची शक्यता असून त्याबाबत बैठका सुरू आहेत.

शरद पवार आणि अजित पवार महापालिका निवडणुकीत एकत्र लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सुप्रिया सुळे या पुण्यातील उमेदवार निवडीसाठी ॲक्शन मोडमध्ये आल्या आहेत.

शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्यामुळे राजकीय समीकरणे आणखी तापली आहेत.

काँग्रेसची भूमिका अद्याप अस्पष्ट

अजित पवार यांनी काँग्रेससोबत युतीची इच्छा व्यक्त केली असून, यावरून काँग्रेसमध्ये मतभेद दिसून येत आहेत. शहराध्यक्ष अरविंद शिंदे युतीसाठी सकारात्मक असताना, ज्येष्ठ नेते मोहन जोशी यांनी याला विरोध दर्शवला आहे.एकंदरीत, पुणे महापालिका निवडणुकीआधी भाजपसह सर्वच पक्षांची रणनीती अंतिम टप्प्यात आली असून, भाजपची उद्याची पहिली उमेदवार यादी पुण्यातील राजकारणाला नवे वळण देणारी ठरण्याची शक्यता आहे.


 Give Feedback



 जाहिराती