सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • एकनाथ शिदेंना ठाण्यात मोठा धक्का! मिनाक्षी शिंदे यांचा शिवसेनेचा राजीनामा
  • लाखोंच्या जनआक्रोशासमोर केंद्र सरकारचं लोटांगण; अरवली पर्वतरांगांमध्ये नवीन खाणपट्ट्यांवर संपूर्ण बंदी
  • मोठी बातमी : जितेंद्र आव्हाड आमचे दुश्मन नाहीत, नजीब मुल्लांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या, ठाण्यातही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चिन्हं!
  • हायकोर्ट अ‍ॅक्शन मोडवर, नायलॉन मांजावर संक्रांत; पालकांना 50 हजार, दुकानदारास अडीच लाखांच्या दंडाचा प्रस्ताव
  • विचारसरणीच्या मुद्द्यावर पवारांची 26 वर्षांची साथ सोडली प्रशांत जगतापांची काँग्रेसमध्ये नवी इनिंग; घाऊक पक्षांतरांच्या काळात ठळक ठरणारा निर्णय
 व्यक्ती विशेष

मोठी बातमी : जितेंद्र आव्हाड आमचे दुश्मन नाहीत – नजीब मुल्लांचे विधान; ठाण्यातही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चिन्हे

डिजिटल पुणे    25-12-2025 15:51:26

ठाणे : पुण्यानंतर आता ठाण्यातही राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या जवळिकीचे संकेत मिळू लागले आहेत. “जितेंद्र आव्हाड आमचे दुश्मन नाहीत” असे स्पष्ट विधान करत अजित पवार गटाचे ठाणे जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.

ठाणे शहरात राष्ट्रवादी पक्ष वाढवायचा असेल, तर आता सर्वांनी गांभीर्याने विचार करायला हवा, असे सूचक वक्तव्य नजीब मुल्ला यांनी केले. “जर ३० तारखेपर्यंत कोणताही प्रस्ताव आला, तर तो पक्षश्रेष्ठींकडे पाठवून त्यावर सकारात्मक विचार केला जाईल. शेवटी आपल्याला कार्यकर्त्यांना निवडून आणायचे आहे” असेही त्यांनी स्पष्ट केले.

कट्टर विरोधकांपासून संभाव्य युतीपर्यंत?

अजित पवार गटाचे नजीब मुल्ला आणि शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे आतापर्यंत कट्टर विरोधक मानले जात होते. मुंब्रा–कळवा विधानसभा मतदारसंघात नजीब मुल्ला यांनी महायुतीतून थेट जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. मात्र आता त्याच ठाण्यात दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येण्याच्या हालचाली सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे.

ठाण्यातही राष्ट्रवादी एकत्र येणार?

“जितेंद्र आव्हाड आमचे दुश्मन नाहीत. ठाण्यात पक्ष वाढवायचा असेल, तर सर्व पर्याय खुले ठेवावे लागतील,” असे म्हणत नजीब मुल्ला यांनी युतीच्या चर्चांना अधिक बळ दिले आहे. त्यामुळे शरद पवार गट देखील अजित पवार गटासोबत पुढील रणनीती ठरवणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, बुधवारी ठाण्यात महाविकास आघाडीची बैठक पार पडली असली तरी अद्याप जागावाटप जाहीर झालेले नाही. अशा परिस्थितीत ठाण्यातील राजकीय समीकरणे नेमकी कोणत्या दिशेने जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


 Give Feedback



 जाहिराती