सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • एकनाथ शिदेंना ठाण्यात मोठा धक्का! मिनाक्षी शिंदे यांचा शिवसेनेचा राजीनामा
  • लाखोंच्या जनआक्रोशासमोर केंद्र सरकारचं लोटांगण; अरवली पर्वतरांगांमध्ये नवीन खाणपट्ट्यांवर संपूर्ण बंदी
  • मोठी बातमी : जितेंद्र आव्हाड आमचे दुश्मन नाहीत, नजीब मुल्लांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या, ठाण्यातही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चिन्हं!
  • हायकोर्ट अ‍ॅक्शन मोडवर, नायलॉन मांजावर संक्रांत; पालकांना 50 हजार, दुकानदारास अडीच लाखांच्या दंडाचा प्रस्ताव
  • विचारसरणीच्या मुद्द्यावर पवारांची 26 वर्षांची साथ सोडली प्रशांत जगतापांची काँग्रेसमध्ये नवी इनिंग; घाऊक पक्षांतरांच्या काळात ठळक ठरणारा निर्णय
 व्यक्ती विशेष

भाजप प्रवेशानंतर राहुल कलाटे यांचा राजकीय धडाका; वरिष्ठ नेत्यांच्या भेटींनी पिंपरी-चिंचवडमध्ये हालचालींना वेग

अजिंक्य स्वामी    25-12-2025 16:11:41

पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राहुल कलाटे यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला असून त्यांच्या सलग भेटीगाठींमुळे शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. पक्षप्रवेशानंतर अवघ्या काही दिवसांतच त्यांनी राज्य आणि शहर पातळीवरील भाजप नेतृत्वाशी संवाद साधत आगामी काळातील राजकीय दिशा स्पष्ट केली आहे.

राहुल कलाटे यांनी महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजपचे प्रदेश महामंत्री राजेश पांडे, भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे, आमदार अमित गोरखे, आमदार उमाताई खापरे तसेच पिंपरी-चिंचवड भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांची एकामागोमाग एक भेट घेतली. या भेटींमुळे पक्षांतर्गत समन्वय अधिक मजबूत करण्यावर भर दिला जात असल्याचे स्पष्ट होत आहे.

या सर्व बैठकींमध्ये आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुका, संघटनात्मक मजबुती, बूथस्तरावरील कार्यकर्त्यांची बांधणी, स्थानिक प्रश्न, नागरी सुविधांचा विकास आणि भाजपची निवडणूक रणनिती यावर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती आहे. विशेषतः शहरात भाजपचा जनाधार अधिक व्यापक करण्यासाठी कार्यकर्त्यांना एकत्र ठेवणे आणि “प्रत्येक प्रभागात भाजप” हा संदेश पोहोचवण्यावर भर देण्यात आला.

राहुल कलाटे यांनी या भेटींमध्ये पिंपरी-चिंचवडमध्ये “शतप्रतिशत भाजप” हे लक्ष्य गाठण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केल्याचे समजते. आगामी काळात शहरभर दौरे, कार्यकर्ता मेळावे, जनसंवाद कार्यक्रम आणि विकासकामांचा आढावा घेत भाजपची ताकद तळागाळापर्यंत पोहोचवण्याची रणनीती आखली जात आहे.

दरम्यान, या संपूर्ण राजकीय हालचालींची माहिती राहुल कलाटे त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून सातत्याने शेअर करत आहेत. नेत्यांसोबतच्या भेटींचे फोटो, व्हिडिओ, कार्यकर्त्यांशी संवाद आणि पक्षप्रवेशानंतरचे कार्यक्रम यामुळे सोशल मीडियावरही त्यांच्या हालचालींची मोठी चर्चा होत आहे. सोशल मीडियावरील या सक्रियतेमुळे समर्थकांमध्ये उत्साह वाढला असून, आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप अधिक आक्रमक आणि संघटित स्वरूपात मैदानात उतरण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.


 Give Feedback



 जाहिराती