सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • एकनाथ शिदेंना ठाण्यात मोठा धक्का! मिनाक्षी शिंदे यांचा शिवसेनेचा राजीनामा
  • लाखोंच्या जनआक्रोशासमोर केंद्र सरकारचं लोटांगण; अरवली पर्वतरांगांमध्ये नवीन खाणपट्ट्यांवर संपूर्ण बंदी
  • मोठी बातमी : जितेंद्र आव्हाड आमचे दुश्मन नाहीत, नजीब मुल्लांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या, ठाण्यातही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चिन्हं!
  • हायकोर्ट अ‍ॅक्शन मोडवर, नायलॉन मांजावर संक्रांत; पालकांना 50 हजार, दुकानदारास अडीच लाखांच्या दंडाचा प्रस्ताव
  • विचारसरणीच्या मुद्द्यावर पवारांची 26 वर्षांची साथ सोडली प्रशांत जगतापांची काँग्रेसमध्ये नवी इनिंग; घाऊक पक्षांतरांच्या काळात ठळक ठरणारा निर्णय
 व्यक्ती विशेष

विचारसरणीच्या मुद्द्यावर पवारांची 26 वर्षांची साथ सोडली प्रशांत जगतापांची काँग्रेसमध्ये नवी इनिंग; घाऊक पक्षांतरांच्या काळात ठळक ठरणारा निर्णय

डिजिटल पुणे    25-12-2025 17:40:40

पुणे : राज्यातील राजकारणात घाऊक प्रमाणात सुरु असलेल्या पक्षांतरांच्या पार्श्वभूमीवर, विचारसरणीच्या मुद्द्यावर दिलेला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट)चे माजी पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचा राजीनामा उठून दिसणारा ठरतो आहे. दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या मुद्यावरून पक्षाला रामराम ठोकणारे जगताप आता काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. प्रदेश काँग्रेसमधील नेत्यांकडून त्यांच्या प्रवेशाला हिरवा कंदील मिळाल्याचे समजते.

अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आघाडी म्हणजे अप्रत्यक्षपणे भाजपला मदत ठरेल, अशी ठाम भूमिका घेत धर्मनिरपेक्ष आणि पुरोगामी विचारधारेच्या मुद्द्यावर प्रशांत जगतापांनी तब्बल 26 वर्षांची शरद पवारांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा

प्रशांत जगतापांच्या राजीनाम्याची चर्चा फक्त पुण्यापुरती मर्यादित न राहता राज्यातील राजकीय वर्तुळात सुरु आहे. कारण ज्या पुरोगामी विचारसरणीच्या मुद्द्यावर शरद पवारांनी भाजपसोबत युती करण्यास नकार दिला आणि ज्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस दुभंगली, त्याच मुद्द्यावर शरद पवारांची साथ सोडण्याचा निर्णय जगतापांनी घेतला आहे.

महापालिका निवडणुकीवरून कोंडी

पुणे महापालिकेची निवडणूक महाविकास आघाडीतील घटक पक्षांसोबतच लढवावी, असा आग्रह शहराध्यक्ष म्हणून प्रशांत जगताप यांचा होता. अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आघाडी केल्यास आपण पक्षाचा राजीनामा देऊ, असे त्यांनी अनेकदा जाहीरपणे सांगितले होते.आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी त्यांनी शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांची अनेकदा भेट घेतली. मात्र पक्ष नेतृत्वाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्याचा निर्णय घेतल्यावर अखेर जगतापांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला.

फुटीनंतरही पवारांसोबत, पण…

राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर पुण्यातील बहुतांश पदाधिकाऱ्यांनी अजित पवारांची साथ दिली. मात्र शहराध्यक्ष असलेल्या प्रशांत जगतापांनी पुरोगामी विचारधारेच्या मुद्द्यावर शरद पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे त्यांना अजित पवारांच्या रोषाला सामोरे जावे लागले.परंतु महापालिका निवडणुकीत त्याच अजित पवारांसोबत आघाडी करण्याचा निर्णय झाल्याने जगतापांची राजकीय कोंडी झाली.

काँग्रेसमध्ये प्रवेशाचा मुहूर्त ठरणार

पुणे महापालिका निवडणुकीसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्यावरून काँग्रेसमध्येही दोन गट आहेत. शहराध्यक्ष अरविंद शिंदे आघाडीच्या बाजूने आहेत, तर ज्येष्ठ नेते मोहन जोशी यांचा त्याला विरोध आहे. या संदर्भात अंतिम निर्णय काँग्रेस वर्किंग कमिटीत होणार असून, त्यानंतरच प्रशांत जगतापांच्या काँग्रेस प्रवेशाचा मुहूर्त ठरण्याची शक्यता आहे.

प्रशांत जगतापांची राजकीय कारकीर्द

पुण्याच्या वानवडी भागातून दोन वेळा नगरसेवक

2016 आणि 2017 मध्ये पुण्याचे महापौर

2024 विधानसभा निवडणूक हडपसर मतदारसंघातून लढवली

अजित पवार गटाचे आमदार चेतन तुपे यांच्याकडून सुमारे 6 हजार मतांनी पराभव

प्रशांत जगताप आणि त्यांचे वडील सुदामराव जगताप हे शरद पवारांचे निष्ठावंत म्हणून ओळखले जातात

काँग्रेसला मिळणार आक्रमक चेहरा

प्रशांत जगतापांच्या प्रवेशामुळे पुणे शहर काँग्रेसला एक आक्रमक आणि अनुभवी चेहरा मिळणार आहे. मात्र त्यासाठी त्यांच्यासमोर वानवडी भागातून पुन्हा नगरसेवक म्हणून निवडून येण्याचे मोठे आव्हान असणार आहे.राजकारणातून विचारधारा वजा झाली असल्याची टीका सध्या महाराष्ट्राच्या राजकारणावर होत आहे. अशा परिस्थितीत, विचारसरणीच्या मुद्द्यावर घेतलेला प्रशांत जगतापांचा निर्णय वेगळा ठरतो आहे. मात्र या निर्णयाला मतदार कसा प्रतिसाद देतात, हे आगामी निवडणुकांमधून स्पष्ट होणार आहे.


 Give Feedback



 जाहिराती