सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • एकनाथ शिदेंना ठाण्यात मोठा धक्का! मिनाक्षी शिंदे यांचा शिवसेनेचा राजीनामा
  • लाखोंच्या जनआक्रोशासमोर केंद्र सरकारचं लोटांगण; अरवली पर्वतरांगांमध्ये नवीन खाणपट्ट्यांवर संपूर्ण बंदी
  • मोठी बातमी : जितेंद्र आव्हाड आमचे दुश्मन नाहीत, नजीब मुल्लांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या, ठाण्यातही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चिन्हं!
  • हायकोर्ट अ‍ॅक्शन मोडवर, नायलॉन मांजावर संक्रांत; पालकांना 50 हजार, दुकानदारास अडीच लाखांच्या दंडाचा प्रस्ताव
  • विचारसरणीच्या मुद्द्यावर पवारांची 26 वर्षांची साथ सोडली प्रशांत जगतापांची काँग्रेसमध्ये नवी इनिंग; घाऊक पक्षांतरांच्या काळात ठळक ठरणारा निर्णय
 व्यक्ती विशेष

मुंबई महानगरपालिका निवडणुकीत कोणाला किती जागा, पहिल्या सर्व्हेचा अंदाज समोर, राज-उद्धव ठाकरेंना किती जागा मिळणार?

डिजिटल पुणे    26-12-2025 12:37:36

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. 15 जानेवारी रोजी मतदान तर 16 जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे. यंदाच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंची युती आणि भाजप–शिंदे शिवसेनेची महायुती यांच्यात थेट लढत पाहायला मिळणार आहे.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी नुकतीच शिवसेना (UBT)–मनसे युती जाहीर केली असून, दुसरीकडे भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील जागावाटप अंतिम टप्प्यात आहे. अशातच मुंबई महापालिकेच्या निकालाबाबतचा पहिला सर्व्हे समोर आला आहे.

‘व्होट वाईब इंडिया’चा सर्व्हे काय सांगतो?

‘व्होट वाईब इंडिया’चे संस्थापक अमिताभ तिवारी यांनी इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत मुंबई महापालिकेच्या निकालाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यांच्या मते, ठाकरे बंधू भाजपला जोरदार टक्कर देतील, मात्र बहुमत महायुतीकडे झुकताना दिसते.

संभाव्य जागावाटप (227 प्रभाग)

भाजप – 82

शिवसेना (शिंदे गट) – 32

शिवसेना UBT – मनसे युती – 79

काँग्रेस – 19

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) – 5

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) – 0

इतर पक्ष – 10

मुंबई महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी 114 जागांचा जादुई आकडा आवश्यक आहे. सर्व्हेनुसार भाजप-शिंदे यांची महायुती हा आकडा गाठताना दिसत आहे.

मुंबईतील मतदार गणित काय सांगतं?

BMC च्या डेमोग्राफिक प्रोफाइलनुसार—

40% मराठी मतदार

20% मुस्लिम मतदार

40% इतर समाज (गुजराती, उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय)

ठाकरे बंधूंच्या युतीमुळे मराठी मतांचे ध्रुवीकरण आणि मुस्लिम मतांचे एकत्रीकरण झाले, तर निकालात मोठा उलटफेर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

काँग्रेस स्वतंत्र लढल्याचा परिणाम?

2024 च्या विधानसभा निवडणुकीत मुस्लिम मतदारांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिला होता. मात्र यंदा काँग्रेस स्वतंत्र निवडणूक लढवणार असल्याने ही मते विभागली जाण्याची शक्यता आहे. याचा थेट फटका ठाकरे युतीला बसू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

निकाल कोणाच्या बाजूने?

शिंदे शिवसेना किती मराठी मते आपल्याकडे वळवते आणि ठाकरे बंधू ‘भावनिक लाट’ निर्माण करण्यात कितपत यशस्वी ठरतात, यावरच मुंबई महानगरपालिकेचा अंतिम निकाल अवलंबून असणार आहे.


 Give Feedback



 जाहिराती