सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मुंबईतील पॉश इमारतीला भीषण आग; बॉलिवूड निर्माते संदीप सिंह थोडक्यात बचावले, अंकिता लोखंडे–विकी जैन यांचा मदतीचा हात
  • नगरपरिषदेच्या निकालानंतर 4 दिवसांत नगरसेविकेच्या पतीची हत्या, खोपोलीत जमावाने पोलीस स्टेशनला घेराव घातला, सब इनस्पेक्टरला सस्पेंड करण्याची मागणी
  • कल्याण-डोंबिवलीमध्ये शिवसेनेसोबत युती नकोच, झालीच तर महापौर आणि स्थायी समिती हवी; भाजप कार्यकर्त्यांची भूमिका
  • राजकारण बंद करेन, पण काँग्रेस सोडणार नाही’ – पक्षप्रवेशानंतर प्रशांत जगतापांचा स्पष्ट निर्धार
 शहर

‘कृष्ण-कृष्ण’ स्वराविष्कार ३ जानेवारी २०२६ रोजी

डिजिटल पुणे    27-12-2025 14:17:01

पुणे : भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत शनिवार, दि. ३ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता ‘कृष्ण-कृष्ण’ हा स्वराविष्कार  कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह(सेनापती बापट रस्ता)येथे होणाऱ्या या कार्यक्रमात 'कृष्ण रसगान आणि कृष्ण रसपान' या संकल्पनेवर आधारित सादरीकरण करण्यात येणार आहे. कार्यक्रमाची निर्मिती, संकल्पना,काव्य आणि संहिता डॉ. शुभांगी शिरढोणकर(इंदूर) यांची असून संगीत दिग्दर्शन जीवन धर्माधिकारी यांचे आहे.स्वर सादरीकरण जितेंद्र अभ्यंकर ,स्वरदा गोखले-गोडबोले करणार असून सूत्रसंचालन प्रवीण शर्मा करणार आहेत.

सांस्कृतिक रसिकांसाठी हा कार्यक्रम एक अनोखा आध्यात्मिक आणि सांगीतिक अनुभव ठरणार असून सर्व रसिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन भारतीय विद्या भवन चे मानद सचिव प्रा. नंदकुमार काकिर्डे यांनी केले आहे.भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजित हा २७१ वा कार्यक्रम आहे. 


 Give Feedback



 जाहिराती