नागपूर : नागपूरमधील सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हॉटेल रॉयल येथे आई आणि मुलाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत मुलाचा मृत्यू झाला असून आईची प्रकृती गंभीर आहे.मृत तरुणाचे नाव सुरज, तर आईचे नाव जयंती असून दोघेही बेंगळुरू येथील रहिवासी आहेत. सुरजचे काही महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. सुरजच्या पत्नीने गुरुवारी बेंगळुरूमध्ये आत्महत्या केली होती. हुंड्यासाठी छळ झाल्याचा आरोप करत मृत तरुणीच्या नातेवाईकांनी बेंगळुरूमध्ये पोलीस ठाण्यासमोर आंदोलन केले होते.
नागपूर मधील एका हॅाटेलमध्ये आई आणि मुलाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. घटनेत मुलाचा मृत्यू तर आई गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. आईचे नाव जयंती तर मुलाचे नाव सुरज असून दोघेही बेंगलूरू येथील रहिवासी आहे. सुरजचं काही महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. सुरजच्या पत्नीने बेंगलूरूमध्ये गुरुवारी आत्महत्या केली होती. हुंड्यासाठी तिचा छळ होत असल्याचा आरोप करत मृत तरुणीच्या नातेवाईकांनी बेंगलूरू येथील स्थानिक पोलीस स्टेशनसमोर आंदोलन केले होते.
बेंगळुरूहून नागपुरात आल्यानंतर हॉटेलमध्ये घटना
दरम्यान बेंगलूरूमध्ये आंदोलन सुरु असताना आई आणि मुलगा नागपुरात दाखल झाले होते. दोघांनीही स्थानिक हॅाटेलमध्ये मुक्काम केला होता. याच होटेलमध्ये दोघांनीही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेत तरुणाचा मृत्यू झालाय. नागपूरच्या सोनेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील हॉटेल रॉयलमध्ये हि घटना उघडकीस आली असून रात्री 12 वाजताच सूमारास ही घटना घडलीय.बेंगळुरूमध्ये आंदोलन सुरू असतानाच आई आणि मुलगा नागपुरात दाखल झाले होते. दोघांनीही स्थानिक हॉटेलमध्ये मुक्काम केला होता. याच हॉटेलमध्ये रात्री सुमारे १२ वाजताच्या सुमारास दोघांनीही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.या घटनेत सुरजचा मृत्यू झाला असून जयंती यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच सोनेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरू आहे.