पुणे : ढोले पाटील ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स येथील इंग्रजी विषयाचे अध्यापक प्रा. प्रशांत इंगोले यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या वतीने पीएचडी (Doctor of Philosophy) पदवी प्रदान करण्यात आली.उच्च शिक्षण व संशोधन क्षेत्रात सातत्यपूर्ण अभ्यास, शिस्तबद्ध संशोधन आणि शैक्षणिक गुणवत्तेच्या जोरावर त्यांनी ही उल्लेखनीय शैक्षणिक कामगिरी साध्य केली आहे. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे सन्माननीय चेअरमन सागर ढोले पाटील यांनी प्रा. इंगोले यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले तसेच त्यांच्या पुढील शैक्षणिक व संशोधनात्मक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
संस्थेतील शिक्षकांच्या संशोधनाला प्रोत्साहन देण्याच्या धोरणाचा हा एक सकारात्मक परिणाम असून, प्रा. प्रशांत इंगोले यांचे यश विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारे आहे. म्हणून सन्माननीय चेअरमन सर यांनी त्यांना प्रोत्साहन म्हणून विशेष बाब म्हणून पारितोषिक जाहीर केले.सन्माननीय चेअरमन सर यांचे आभार मानून प्रा इंगोले यांचे प्राचार्य प्रा. विठ्ठल गायकवाड यांनी अभिनंदन केले.
