उरण : ग्रामपंचायत नवघर तर्फे दिव्यांग बांधवांना ग्रामपंचायत निधीतून ५% अनुदानातून दिव्यांग बांधवांना निधी वाटप करण्यात आले.यावेळी ग्रामपंचायत नवघर च्या सरपंच सविता नितीन मढवी, उपसरपंच प्रियदर्शनी अविनाश म्हात्रे, ग्रामसेवक अविनाश मधुकर पिंपलकर, माजी उपसरपंच विद्यमान सदस्य विश्वास तांडेल, दिनेश बंडा, संध्या पाटील, ग्रामपंचायत सदस्य आरती चौगुले, कुंदन कडू, अक्षरा जोशी, श्रीमती उषा बंडा, नयना बंडा, श्रीमती रंजना भोईर, कविता पाटील, रत्नाकर चौगुले, नम्रता पाटील, प्राची पाटील, जयमला पाटील, ग्रामपंचायत मधील स्थानिक नागरिक सामाजिक कार्यकर्ते अविनाश म्हात्रे, नितिन मढवी, आतिश भोईर, कुंदन बंडा, महावीर पाटील,अरुण पाटील आणि ग्रामपंचायत मधील कर्मचारी उपस्थित होते.ग्रामपंचायत नवघर तर्फे शासनाच्या विविध योजना,उपक्रम,सेवा सवलती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सतत अविरतपणे सुरु असून जनतेच्या कल्याणासाठी सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी,गावातील प्रतिष्ठित नागरिक, ग्रामस्थ हे प्रयत्नशील असून ग्रामपंचायत तर्फे आजपर्यंत अनेक लोकोपयोगी योजना उपक्रम राबविण्यात आले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून दिव्यांग बांधवांना निधी वाटप करण्यात आले आहे.