सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मुख्यमंत्र्यांच्या नागपुरातच भाजपची मोठी कोंडी; 151 जागांसाठी 300 उमेदवारांना तयारीत राहण्याचे निर्देश
  • उद्धव ठाकरे जुना वाद विसरले, ज्यांच्यामुळे सत्ता गेली त्यांच्याशी पुन्हा हात मिळवला, अकोल्यात बच्चू कडूंच्या प्रहार अन् ठाकरे गटाची युती
  • ट्रम्प यांचं टॅरिफ कार्ड अंगलट; अमेरिकेत कंपन्यांच्या दिवाळखोरीचा 15 वर्षांचा उच्चांक
  • मोठी बातमी! पुण्यातही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, अजितदादांना 125, शरद पवार गट 40 जागा लढवणार, मध्यरात्रीच्या बैठकीत शिक्कामोर्तब
  • मोठी बातमी: शरद पवार गटाला मुंबईत मोठा धक्का, राखी जाधव भाजपमध्ये प्रवेश करणार
 शहर

रेणुताई गावस्कर व सेवा संकल्प प्रतिष्ठानला 'पद्मश्री डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ यशोदा माई राष्ट्रीय' पुरस्कार

डिजिटल पुणे    29-12-2025 15:09:30

पुणे: अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'पद्मश्री' डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ ( माई ) यांच्या कार्याचा वारसा पुढे नेणाऱ्या 'माई परिवार'तर्फे त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त 'यशोदा माई राष्ट्रीय पुरस्कार'  प्रदान करण्यात येतो. यावर्षी या पुरस्काराचे चौथे वर्ष. यंदाचा हा मानाचा 'पद्मश्री डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ यशोदा माई राष्ट्रीय पुरस्कार' सामाजिक क्षेत्रात निस्पृहपणे काम करणाऱ्या मा. रेणुताई गावस्कर (अध्यक्षा - एकलव्य बाल शिक्षण व आरोग्य न्यास, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) आणि सेवा संकल्प प्रतिष्ठान (चिखली, जि. बुलढाणा) यांना जाहीर झाला आहे. अशी माहिती ममता सिंधुताई सपकाळ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.  

'पद्मश्री डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ यशोदा माई राष्ट्रीय पुरस्कार' प्रदान सोहळा रविवार, ४ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५:३० वाजता पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार आहे. माईंचा खडतर पण प्रेरणादायी जीवनप्रवास लहान मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी 'चिंधीची गोष्ट' हा विशेष बालकथासंग्रह तयार करण्यात आला आहे. या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. या सोहळ्यासाठी  कार्यक्रमाचे अध्यक्ष पद मा. पद्मश्री श्री.  गिरीश प्रभुणे भूषवतील, प्रमुख पाहुणे म्हणून भारत फोर्ज लिमिटेडचे उपाध्यक्ष  व सहव्यवस्थापकीय संचालक मा. श्री. अमित कल्याणी उपस्थित राहणार आहेत तर विलू पूनावाला फाऊंडेशनचे सीईओ मा. श्री. जसविंदर नारंग यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती असेल. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्षिप्रा मानकर (अमरावती) या करतील.माईंच्या विचारांवर श्रद्धा ठेवणाऱ्या आणि त्यांच्या कार्यात रस असणाऱ्या सर्व पुणेकरांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन माई परिवारातर्फे करण्यात आले आहे.


 Give Feedback



 जाहिराती