सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मुख्यमंत्र्यांच्या नागपुरातच भाजपची मोठी कोंडी; 151 जागांसाठी 300 उमेदवारांना तयारीत राहण्याचे निर्देश
  • उद्धव ठाकरे जुना वाद विसरले, ज्यांच्यामुळे सत्ता गेली त्यांच्याशी पुन्हा हात मिळवला, अकोल्यात बच्चू कडूंच्या प्रहार अन् ठाकरे गटाची युती
  • ट्रम्प यांचं टॅरिफ कार्ड अंगलट; अमेरिकेत कंपन्यांच्या दिवाळखोरीचा 15 वर्षांचा उच्चांक
  • मोठी बातमी! पुण्यातही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, अजितदादांना 125, शरद पवार गट 40 जागा लढवणार, मध्यरात्रीच्या बैठकीत शिक्कामोर्तब
  • मोठी बातमी: शरद पवार गटाला मुंबईत मोठा धक्का, राखी जाधव भाजपमध्ये प्रवेश करणार
 व्यक्ती विशेष

मुख्यमंत्र्यांच्या नागपुरातच भाजपची मोठी कोंडी; 151 जागांसाठी 300 इच्छुकांना तयारीत राहण्याचे निर्देश

डिजिटल पुणे    29-12-2025 16:15:33

नागपूर : राज्यातील महापालिका निवडणुकांची रणधुमाळी अंतिम टप्प्यात पोहोचली असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या होम ग्राऊंड असलेल्या नागपूर महापालिकेत भाजपची मोठी कोंडी झाल्याचं चित्र दिसत आहे. नागपूर महापालिकेच्या 151 जागांसाठी भाजपने तब्बल 300 कार्यकर्त्यांना उमेदवारी अर्ज व आवश्यक कागदपत्रे तयार ठेवण्याचे निर्देश दिल्याची माहिती समोर आली आहे.सध्या नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना, इच्छुक उमेदवारांची प्रचंड गर्दी होत असल्याने अनेक राजकीय पक्षांनी उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर न करता थेट एबी फॉर्म देणे किंवा अर्जाची तयारी करण्याचा निरोप देण्याची रणनीती अवलंबल्याचं दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये भाजपसमोर मोठे आव्हान उभं राहिलं आहे.

एकाच प्रभागात अनेक दावेदार, मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातही गोंधळ

भाजपकडे अनेक प्रभागांमध्ये एकाहून अधिक सक्षम दावेदार असल्याने अद्याप अंतिम निर्णय घेता आलेला नाही. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघातील प्रभागातही गोंधळसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याचं समजत आहे.भाजप शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, “सध्या सुमारे 300 कार्यकर्त्यांना उमेदवारी अर्ज व कागदपत्रे तयार ठेवण्यास सांगण्यात आलं आहे. उद्याच भाजपच्या उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.”

भाजप 140 जागांवर लढणार; शिवसेनेला 8 ते 10 जागांवर समाधान

नागपूर महापालिकेत एकूण 151 जागा असून, युतीतील मित्रपक्ष असलेल्या शिंदे गटाच्या शिवसेनेसाठी 8 ते 10 जागा सोडण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजप किमान 140 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट होत आहे. परिणामी, शिवसेनेला नागपूरमध्ये मर्यादित जागांवरच समाधान मानावं लागणार आहे.

मविआ एकत्र, अजित पवारांची राष्ट्रवादी वंचितसोबत चर्चा

नागपूरमध्ये महाविकास आघाडी (मविआ) एकत्र निवडणूक लढवण्यावर जवळपास एकमत झाल्याची माहिती आहे. सूत्रांच्या माहितीनुसार,

काँग्रेस – 129 जागा

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) – 12 जागा

ठाकरे गटाची शिवसेना – 10 जागा

या जागावाटपाच्या सूत्राला स्थानिक पातळीवर मान्यता मिळाल्याचं सांगितलं जात आहे.दरम्यान, भाजपकडून अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसला युतीसाठी विचारणा न झाल्याने, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. या चर्चा सकारात्मक टप्प्यात असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

नागपूर महापालिका निवडणूक कार्यक्रम

नामनिर्देशन अर्ज स्वीकारणे: 23 डिसेंबर 2025 ते 30 डिसेंबर 2025

अर्जांची छाननी: 31 डिसेंबर 2025

उमेदवारी माघार अंतिम मुदत: 02 जानेवारी 2026

निवडणूक चिन्ह वाटप: 03 जानेवारी 2026

अंतिम उमेदवार यादी: 03 जानेवारी 2026

मतदान: 15 जानेवारी 2026

मतमोजणी: 16 जानेवारी 2026


 Give Feedback



 जाहिराती