सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मुख्यमंत्र्यांच्या नागपुरातच भाजपची मोठी कोंडी; 151 जागांसाठी 300 उमेदवारांना तयारीत राहण्याचे निर्देश
  • उद्धव ठाकरे जुना वाद विसरले, ज्यांच्यामुळे सत्ता गेली त्यांच्याशी पुन्हा हात मिळवला, अकोल्यात बच्चू कडूंच्या प्रहार अन् ठाकरे गटाची युती
  • ट्रम्प यांचं टॅरिफ कार्ड अंगलट; अमेरिकेत कंपन्यांच्या दिवाळखोरीचा 15 वर्षांचा उच्चांक
  • मोठी बातमी! पुण्यातही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, अजितदादांना 125, शरद पवार गट 40 जागा लढवणार, मध्यरात्रीच्या बैठकीत शिक्कामोर्तब
  • मोठी बातमी: शरद पवार गटाला मुंबईत मोठा धक्का, राखी जाधव भाजपमध्ये प्रवेश करणार
 व्यक्ती विशेष

पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र; अजित पवार गटाला 110, शरद पवार गटाला 18 जागा प्रभाग 9 आणि 20 मध्ये मैत्रीपूर्ण लढत

डिजिटल पुणे    30-12-2025 10:55:17

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस—अजित पवार गट आणि शरद पवार गट—एकत्रितपणे निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शहरातील सत्ता समीकरणे लक्षात घेऊन दोन्ही गटांमध्ये जागावाटपाचा प्राथमिक फॉर्म्युला निश्चित करण्यात आला आहे.

या फॉर्म्युल्यानुसार एकूण 128 जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गट 18 जागांवर उमेदवार उभे करणार असून उर्वरित 110 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाकडून उमेदवारी दिली जाणार आहे. दोन्ही गटांच्या स्थानिक नेतृत्वामध्ये सकारात्मक वातावरण असून, एकत्र लढून शहरातील सत्ता मिळवणे हे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे सांगण्यात येत आहे.

प्रभाग 9 आणि 20 मध्ये मैत्रीपूर्ण लढत

या युतीतील विशेष बाब म्हणजे प्रभाग क्रमांक 9 आणि 20 मध्ये दोन्ही गटांमध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार आहे. स्थानिक समीकरणे, इच्छुकांची संख्या आणि संघटनात्मक ताकद लक्षात घेऊन या दोन प्रभागांमध्ये दोन्ही गट स्वतंत्र पॅनेल उभे करणार आहेत. त्यामुळे या प्रभागांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

आज अंतिम यादी जाहीर होणार

इतर प्रभागांमध्ये उमेदवार निवड, प्रभागनिहाय आढावा आणि प्रचारयंत्रणेची आखणी सुरू असून, दोन्ही गटांच्या संयुक्त बैठका आणि स्थानिक नेत्यांशी चर्चा सुरू आहेत. आज मंगळवारी (दि. 30) उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होणार असून, त्यानंतर प्रचाराला वेग येणार आहे.

अजित पवार गटाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष योगेश बहल यांनी माहिती देताना सांगितले की, “पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार आहेत. शरद पवार गटाला 18 जागा देण्यात आल्या असून प्रभाग 9 आणि 20 मध्ये मैत्रीपूर्ण लढत होईल.” त्यांनी हेही नमूद केले की, शरद पवार गटाचे काही इच्छुक उमेदवार अजित पवार गटाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत.पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादींची ही युती शहराच्या राजकारणात निर्णायक ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


 Give Feedback



 जाहिराती