सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
  • नाशिकमध्ये प्रचंड गोंधळ, भाजपकडून पोलीस बंदोबस्तात AB फॉर्मचं वाटप; तिकिटाचा काळाबाजार होत असल्याचा इच्छुक उमेदवारांचा आरोप
  • पुण्यात भाजप अन् शिवसेनेची युती तुटली नाही; एबी फॉर्म दिलेत पण....; उदय सामंतांनी युतीचं चित्र केलं स्पष्ट
 राजकारण

शांतीदूत परिवारातर्फे उमरगा नवनिर्वाचित नगराध्यक्ष किरणभैया गायकवाड यांचा सत्कार

गजानन मेनकुदळे    31-12-2025 14:39:52

उमरगा : शांतीदूत परिवारातर्फे उमरगा नगरपरिषदेचे लोकप्रिय नवनिर्वाचित नगराध्यक्ष किरणभैया गायकवाड यांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. त्यांच्या सामाजिक बांधिलकीच्या संकल्पनेला अनुसरून प्रा. जीवन जाधव (अध्यक्ष, शांतीदूत परिवार मराठवाडा) यांच्या हस्ते वह्या, पेन व पुस्तके भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

 

यावेळी शांतीदूत श्याम पाटील यांनी शांतीदूत परिवाराची स्मरणिका सप्रेम भेट दिली. तसेच डॉ. योगिता जाधव-कराळे यांच्या हस्ते श्रीकृष्ण मूर्ती, तर सौ. विद्याताई जाधव (संस्थापक अध्यक्षा, शांतीदूत परिवार) आणि डॉ. विठ्ठल जाधव (आयपीएस, विशेष पोलिस महानिरीक्षक, महाराष्ट्र राज्य – सेवानिवृत्त) यांच्या हस्ते शाल व रोप देऊन नगराध्यक्ष किरणभैया गायकवाड यांचा गौरव करण्यात आला.

 

 

शांतीदूत परिवारातर्फे नवनिर्वाचित नगराध्यक्षांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले असून त्यांच्या पुढील प्रदीर्घ, यशस्वी व लोकाभिमुख कारकिर्दीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.या प्रसंगी शांतीदूत पत्रकार लक्ष्मण पवार, नसीरुद्दीन फकीर, पेंटर संतोष चव्हाण, युवा नेते योगेश तपासाळे (सांगवे), संतोष मोहिते पाटील, अनेक बाल शांतीदूत तसेच स्थानिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 Give Feedback



 जाहिराती